Wednesday, April 17, 2024

/

प्रा. डी. वाय. कुलकर्णी : जगभ्रमंती करणारा एक अवलिया

 belgaum

बेळगाव लाईव्ह : Kulkarni जगप्रवासाद्वारे विविध देशांना भेटी देण्याची आवड असलेले आणि मागील वर्षी या भेटींचे शतक पूर्ण करणारे आर. एल. लाॅ कॉलेज, बेळगावचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. डी. वाय. कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत 104 देशांना भेटी दिल्या असून दर तीन वर्षातून एकदा ते जगभ्रमंतीला निघतात हे विशेष होय.

वॉशिंग्टन मधील एका मित्राच्या सल्ल्यावरून प्रा. डी. वाय. कुलकर्णी यांचा प्रारंभी युरोपात मुक्काम सुरू झाला. क्रिसमसच्या सुट्टीत युरोपचा प्रवास करणाऱ्या प्रा. कुलकर्णी यांनी युरेलच्या अमर्यादित प्रवासी पासद्वारे त्यावेळी 14 देशांना भेटी दिल्या. अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉन येथे जाणे आज सर्वसामान्यांसाठी अशक्य आहे. मात्र 1978 मध्ये पेंटॅगॉन येथील आपल्या मित्राला भेटण्यासाठी प्रा. कुलकर्णी सातत्याने जात असत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष कार्टर जिथून सेकंड लेफ्टनंट म्हणून कार्यान्वित झाले त्या ॲनापाॅलीस येथील अमेरिकेच्या नौदल अकॅडमीला देखील त्यांनी भेट दिली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालय, लवादचे कायमचे न्यायालय, इंग्लंडमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स, व्हियन्ना मधील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, युएन आणि युनेस्को मुख्यालय, ओसलो येथील नोबल पीस फाउंडेशन, लिथुआनिया येथील पूर्व केजीबी मुख्यालय अशा महत्त्वाच्या असंख्य स्थळांना प्रा. डी. वाय. कुलकर्णी यांनी भेटी दिल्या आहेत.

सेवानिवृत्तीनंतर सुमारे 15 वर्षे सातत्याने जगप्रवास करणाऱ्या प्रा. कुलकर्णी यांनी 2023 मध्ये विविध देशांच्या आपल्या भेटींचे शतक पूर्ण केले. आपण भेट दिलेल्या देशोदेशींच्या यादीमध्ये गेल्यावर्षी त्यांनी आणखी 4 देशांची भर घातली. माजी प्राचार्य प्रा. डी. वाय. कुलकर्णी यांनी आतापर्यंत 7 वेळा अमेरिकेला, 4 वेळा जर्मनी, 3 वेळा कॅनडा, 3 वेळा रशिया, 4 वेळा ऑस्ट्रिया, 4 वेळा सिंगापूर, 3 वेळा हॉंगकॉंग, 3 वेळा मलेशिया या पद्धतीने बऱ्याच देशांना वारंवार भेटी दिले आहेत. अलीकडेच ते टुनेशिया, मोरोक्को आणि सेनेगलचा दौरा करून परतले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.