Sunday, May 19, 2024

/

उर्दू शाळांमध्ये आता दर शुक्रवारी ‘नो बॅग डे’

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानक ज्याला ‘गोवा बस स्टॅन्ड’ या नावाने ओळखले जाते. या बस स्थानकाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास करण्यात आला असला तरी विकासाची ती चिन्हे आता लोप पावत असल्याचे चित्र दिसत असून या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या या रेल्वे स्थानकासमोरील आसन व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. याठिकाणी असलेल्या दुकानगाळ्यांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून अद्यापही हे गेले बंद अवस्थेत आहेत. यामुळे याठिकाणी गैरप्रकारांना ऊत आला असून मद्यपी आणि भिक्षुकांचा वावर अधिक होत चालल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर बसस्थानक हे छावणी परिषदेच्या हद्दीत येते. या बसस्थानकासाठी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत २ कोटी रुपयांचा खर्च करून विकास करण्यात आला आहे. ७ फलाट असणाऱ्या या बसस्थानकावरील बसेसची संख्या छावणी परिषदेकडून आकारल्या जाणाऱ्या पार्किंग शुल्काच्या वादावरून घटली आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी या बसस्थानकाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत अधिक माहिती दिली. आधुनिक पायाभूत सुविधेचे प्रतीक असूनही अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे सदर बस स्थानकाची दुर्दशा झाली आहे. सुविधा पुरविण्यात आल्यानंतर देखभालीच्या जबाबदारीतून छावणी परिषदेने पळवाट काढल्याने बसस्थानक परिसरात निर्माण करण्यात आलेली दुकाने, पोलीस चौकी, महिलांसाठीचे प्रतीक्षागृह आदी सुविधा बंद अवस्थेत आहेत. याठिकाणी योग्य सोयी सुविधा आणि देखभाल नसल्याने अवैध प्रकारांना ऊत आला आहे. शिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.Bus stand

 belgaum

या समस्येसंदर्भात छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असता, या भागात रहदारीचे प्रमाण कमी असल्याने २० हजार प्रति महिना भाडे देऊन दुकानगाळे चालविण्यास कोणीही पुढाकार घेत नसल्याचे सांगण्यात आले. भाड्याची रक्कम एक चतुर्थांश इतकी कमी करून निविदा काढण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सदर बस स्थानकावर गोवा राज्याच्या केवळ ८ बस आणि वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या 8 बस येतात अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

या संदर्भात वायव्य परिवहनचे विभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी परिषदेकडून आकारण्यात येत असलेल्या जादा पार्किंग शुल्कामुळे हि समस्या उद्भवल्याचे सांग्यात आले. छावणी परिषदेने पार्किंग शुल्कात कपात केल्यास बससंख्याही वाढेल आणि परिणामी दुकानदारांचा व्यवसाय वाढेल जेणेकरून दुकानाचे भाडे देणे शक्य होईल, याचबरोबर याठिकाणी उद्भवलेल्या असुविधाही कमी होतील, असे ते म्हणाले.

सदर बसस्थानकावर उद्भवलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उत्तर मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ यांनी छावणी परिषदेचे अधिकारी आणि परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केल्याचे समजते. या बैठकीत उपरोक्त समस्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.