Thursday, November 21, 2024

/

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेचा ‘हा आहे’ अंतिम निकाल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित खुल्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सांघिक विजेतेपद क्रिएटिव्ह कार्टी मुंबईच्या ‘इंटररोगेशन’ या एकांकिकेने पटकावले. तसेच बेळगाव जिल्हा आंतरशालेय गटाचे सांघिक जेतेपद वरेरकर नाट्यसंग बेळगावच्या ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ या एकांकिकेने मिळविले.

शहरातील कॅपिटल वन संस्थेतर्फे सलग दोन दिवस कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिर येथे आयोजित एकांकिका स्पर्धा काल रविवारी सायंकाळी यशस्वीरित्या उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. दोन गटात घेण्यात आलेल्या सदर स्पर्धेतील खुला आंतरराज्य गटाच्या स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे पारितोषिक, संस्थेचे नांव, एकांकिकेचे नांव, कलाकाराचे नांव यानुसार) पुढील प्रमाणे आहे.

खुला गट : उत्कृष्ट नेपथ्य -राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, ‘विषण’, साक्षी करनाळे आणि श्रुती साळुंखे. उत्कृष्ट वेशभूषा/ रंगभूषा -निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी, ‘विनोबा’, सुनिता वर्मा. उत्कृष्ट पार्श्वसंगीत – संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ‘लिअर’, सिद्धार्थ खांडेकर. उत्कृष्ट प्रकाशयोजना गायन समाज देवल क्लब कोल्हापूर,

‘बिइंग अँड नथिंग’, ओमकार मासरणकर. अभिनय (स्त्री) : उत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) -गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, ‘बीइंग अँड नथिंग’, रितिका गुरुप्रसाद नीने. उत्तेजनार्थ -संगीत व नाट्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, ‘लिअर’, ऋतुजा वडवे.

अभिनय (पुरुष) : उत्कृष्ट अभिनेता अभिरुची कोल्हापूर, ‘इम्युनो कॉम्प्रोमाईज’, संजय दिवाण. उत्तेजनार्थ -कलासक्त मुंबई, ‘संपर्क क्रमांक’, गौरव पाटील. उत्कृष्ट दिग्दर्शन – क्रिएटिव्ह कार्टी मुंबई, ‘इंटररोगेशन’, योगेश कदम. उत्तेजनार्थ -गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, ‘बीइंग अँड नथिंग’, अनुपम मनोहर दाभाडे.

परीक्षकांनी शिफारस केलेली उत्तेजनार्थ पारितोषिके अभिनव प्रमाणपत्र अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली ‘अत्त दीप भव’, आर्या जयवंत कदम. निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी, ‘विनोबा’, आसावरी झिरमिरे. नाट्यशुभांगी जयसिंगपूर, ‘फिनिक्स’ सुभाष टाकळीकर. कलासक्त मुंबई, ‘संपर्क क्रमांक’, यशस्वी कंटक. रंगयात्रा इचलकरंजी ‘कुपन’,

प्राची करोशी. राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, ‘विषण’, सौमित्र कागलकर. सांघिक विजेते : प्रथम क्र. – क्रिएटिव्ह कार्टी मुंबई (इंटररोगेशन), द्वितीय क्र. -रंगयात्रा इचलकरंजी (कुपन), तृतीय क्र. -निर्मिती नाट्य संस्था सातारा (लेबल), उत्तेजनार्थ -प्रोसेस इन थिएटर आणि आरपीडी महाविद्यालय बेळगाव (मेड फॉर इच अदर), गायन समाज देवल क्लब कोल्हापूर (बीइंग अँड नथिंग).Ekankika

बेळगाव जिल्हा शालेय गटाचा अंतिम निकाल (अनुक्रमे पारितोषिक, संस्थेचे नांव, एकांकिकेचे नांव, कलाकार /तंत्रज्ञाचे नांव यानुसार) पुढील प्रमाणे आहे. उत्कृष्ट वेशभूषा /रंगभूषा : अमृता क्रिएशन्स बेळगाव, ‘ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सोजेस’, रोहिदास पाटील. उत्कृष्ट स्त्री अभिनय -वररकर नाट्य संघ बेळगाव, ‘अजब लोठयांची महान गोष्ट’, रांवी कोटबागे.Ekankika

उत्तेजनार्थ -अमृता क्रिएशन्स बेळगाव, ‘ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सॉजेस’, कार्तिकी मौर्य. परीक्षकांनी शिफारस केलेली उत्तेजनार्थ पारितोषिके -एसकेई सोसायटी ठळकवाडी हायस्कूल बेळगाव, ‘आप्पल पोटे’, गौरी पाटील. मराठी विद्यानिकेतन बेळगाव, ‘…आणि झाडे डोलू लागली’, प्रेरणा पाटील. उत्कृष्ट पुरुष अभिनय -अमृता क्रिएशन बेळगाव, ‘ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट सॉजेस’, पार्थ पाटील. उत्तेजनार्थ -वरेकर नाट्य संघ बेळगाव,

‘अजब लोठयांची महान गोष्ट’, पुष्कर आपटे. उत्कृष्ट दिग्दर्शन -वरेरकर नाट्य संघ बेळगाव, ‘अजब लोठयांची महान गोष्ट’, जितेंद्र रेडेकर. सांघिक विजेते प्रथम क्र. -वरेकर नाट्य संघ बेळगाव (अजब लोठयांची महान गोष्ट), द्वितीय क्र. -एसकेइ सोसायटी ठळकवाडी हायस्कूल बेळगाव (आप्पलपोटे) तृतीय क्र. -मराठी विद्यानिकेतन बेळगाव (…आणि झाडे डोलू लागली).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.