Saturday, October 5, 2024

/

शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह:शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिरे येथे काल रविवारी झालेल्या बैठकीत शहर समिती संघटना बळकट करून तिची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समितीचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर रमाकांत कोंडुसकर, गुणवंत पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील व नगरसेवक रवी साळुंखे उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने विविध उपाय सुचवले आणि सूचना मांडल्या. त्याचप्रमाणे समितीच्या कार्यकारिणीची निवड करताना अनेक विभाग निर्माण करून समिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

समितीची रचना करताना समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. म. ए. समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू असतात. त्याबद्दल लोकांना माहिती देणे, समितीच्या एकंदर कार्यप्रणालीशी त्यांना अवगत करणे. तसेच समितीच्या उपक्रमांना लोकांचा प्रतिसाद मिळवणं या पद्धतीने कार्य करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.Mes city unit

समाजाने आजवर समितीच्या लोकसभेच्या उमेदवाराला मतं दिली आणि आर्थिक मदतही केली. समिती उमेदवाराला समाजाकडून मोठ्या प्रमाणात मतदान होते. थोडक्यात समाजाच्या रेट्यामुळेच समिती उमेदवार उभा केला जातो.

तेंव्हा आपली मते राखण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी समितीने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता फक्त लोकसभा नव्हे तर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा करणे गरजेचे असल्याचे मतही कालच्या बैठकीत प्रकर्षाने मांडण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.