Sunday, April 28, 2024

/

बिडीजवळ भीषण अपघात; ६ ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील कित्तूर कडून बिडीमार्गे लग्नसोहळा आटोपून घरी परतत असतानाचालकाचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात घडला आहे.

या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी अधिक होती कि यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून अपघातस्थळावरील दृश्ये हि थरकाप उडवणारी होती.

खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप्प गावाजवळ गुरुवारी दुपारी हि घटना घडली आहे. एम एच.
१२, इ एक्स ३०५२ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून १० जण प्रवास करत होते. कित्तूर्  कडून बिडी कडे वलीमा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  मुस्लिम समाजातील हे कुटुंब कितुर कडून बिडी कडे जात होते त्यावेळी मंग्यांकोप गावाजवळ  चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.Accident

 belgaum

मृतांमध्ये शाहरुख पेंढारी (३०), इकबाल जमादार (५०), सानिया लंगोटी (३७), उमर लंगोटी (१७), शबनम लंगोटी (३७) फरान लंगोटी (१३) यांचा समावेश आहे. अपघातात आणखी ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून बेळगावचे एसपी भीमा शंकर गुळेद घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.