Sunday, May 19, 2024

/

मद्यपी वाहनचालकांसाठी पोलीस खात्याचा नवा उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकांना पकडले तर संबंधित वाहनचालकाला न्यायालयात हजर होऊन दंड भरावा लागत असे. मात्र आता या किचकट प्रक्रियेवर र्याय म्हणून मद्यपी वाहनचालकाला ऑनलाईन हजेरी लावण्यासह दंड भरण्याची मुभा उपलब्ध करून देण्याचा विचार पोलिस खात्याने चालविला आहे.

ड्रिंक अँड ड्राइव्हसंबंधीचा हा नवीन प्रयोग सुरू करण्यासाठी राज्य पोलिस खात्याने बेळगाव व म्हैसूर महापालिका परिसराची निवड केली आहे. या परिसरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. तो यशस्वी झाला की मग त्याचा विस्तार राज्यभरात सर्वत्र करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला बेळगाव व म्हैसूरमधून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ होणार आहे. त्याला अपेक्षित यश मिळाले तर या प्रयोगाचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.

राज्य पोलिस खात्याने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे न्यायालयासह पोलिस खाते व वाहनचालकांचा वेळही वाचेल. परंतु, याबाबतची मार्गसूची अद्याप आमच्याकडे आलेली नाही. लेखी आदेश आल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया रहदारी व गुन्हे शाखेच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी दिली आहे. मद्य पिऊन वाहन चालविण्यावर कायद्याने बंदी आहे.

 belgaum

यासाठीच सायंकाळनंतर अनेक ठिकाणी रहदारी पोलिस जागोजागी दबा धरून थांबलेले असतात. विशेषतः बार व वाईन शॉप्स अधिकत्वाने असलेल्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती असते. मद्यप्राशन करुन दुचाकी अथवा चारचाकी घेऊन एखादा इसम बाहेर पडला की त्याला अडवून तपासणी केली जाते. ब्रेथलायझर मशिनद्वारे संबंधिताच्या पोटात नेमके किती अल्कोहोल आहे, याची शहानिशा करून दंडात्मक कारवाई केली जाते. नवीन नियमानुसार सध्या हा दंड तब्बल १० हजार रुपये आहे.

पोलिसांनी अडविल्यानंतर अनेकजण दंड भरायलाही तयार असतात. परंतु, ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात जागेवरच दंड आकारला जात नाही. संबंधिताला दंडाची पावती दिली जाते व दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊन दंड भरण्यास सांगितले जाते. रात्री-अपरात्री पकडल्यानंतर संबंधिताचे वाहनही जप्त करून पोलिस ठाण्यात नेऊन लावले जाते.

एकतर रात्रीच्या वेळी त्या व्यक्तीला जाण्याची अडचण येते. याशिवाय दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊन दंड भरण्यासाठी वेळ खर्ची पडतो. अशा किचकट प्रक्रियेतून जावे लागत असल्याने पोलिस खात्याने ही प्रक्रियाच सोपी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्यास त्याचे वाहन जप्त होणार हे निश्चित. परंतु, दुसऱ्या दिवशी जो न्यायालयात वेळ जात होता त्यावरही उपाय शोधण्यात आला आहे. संबंधिताचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर एक संदेश व लिंक पाठवली जाईल.

या संदेशात संबंधिताने न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठीही वेळ दिली जाईल. त्यावेळी ती लिंक ओपन करून न्यायालयात ऑनलाईन हजेरी लावता येईल. न्यायालयाकडून मद्य पिऊन वाहन चालविल्याबद्दलची ऑनलाईन विचारणाही केली जाईल. त्यानंतर न्यायालयाने सुचवलेला दंडही ऑनलाईन भरता येणार आहे. या सर्व प्रक्रियेला न्यायालयानेही मान्यता दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.