Sunday, October 6, 2024

/

तात्काळ पूर्ण करा बेळगाव -गोवा रस्त्यांचे काम -बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव आणि गोवा यांचे संबंध फार जुने आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेळगाव व गोव्याला जोडणारा मार्ग चांगल्या स्थितीत असण्याची गरज आहे. मात्र सध्याची परिस्थिती उलट असून चोर्ला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे विकास काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नियोजित बेळगाव रिंग रोडच्या भूमिपूजन समारंभासाठी आले असता बेळगाव ट्रेडर्स फोरमने त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी बेळगावला गोव्याशी जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे विकास काम युद्धपातळीवर पूर्ण होणे प्रचंड गरजेचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. पर्यटनासाठी बेळगावचे नागरिक गोव्यावर अवलंबून आहेत तर व्यापार -खरेदीसाठी गोमंतकीय नागरिक बेळगाववर अवलंबून आहेत.

त्या निमित्ताने रोजची वाहतूक ठरलेली असते. मात्र खराब रस्त्यामुळे वाहतुकीचे अडथळे बेळगाव व गोवा यांच्यातील संबंधांवर परिणाम करत असल्याचे नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याच बरोबर अनमोड मार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्याचे आणि त्यावरील पुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम तात्काळ पूर्ण करावे.Traders forum

बेळगावहून गोव्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेला जवळपास 150 कि.मी. अंतराचा हा रस्ता खराब झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याबरोबरच गोव्याच्या मोपा विमानतळाला जोडणाऱ्या चंदगड मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या सर्वेक्षणाची आणि महामार्ग स्वरूपात उभारण्याची मागणी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीकडे तातडीने लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन बेळगाव ट्रेडर्स फोरमला दिले.

याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर,  किरण गावडे, अरुण कुलकर्णी व इतर यावेळी उपस्थित होते.

*केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का?*

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का?

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.