बेळगाव लाईव्ह :श्री समादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष, हळदीपूर गुरुमठ शाखा गोवावेसचे अध्यक्ष तसेच बेळगाव मधील विविध संस्थांमध्ये उच्च पदावर कार्यरत वैश्यवाणी समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व बापूसाहेब अनगोळकर यांनी नार्वेकर गल्ली, शहापूर येथील श्री समादेवीला 4.5 लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार अर्पण करून देवीची सेवा केली आहे.
बापूसाहेब अनगोळकर यांनी पूर्वी शहापूर येथील श्री समादेवी कार्यालय बांधते वेळी भरीव अशी मदत केली आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी श्री समादेवीला हिऱ्यांचा हार अर्पण करून आपले दानशूर व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
बापूसाहेब अनगोळकर यांनी श्री समादेवी देवस्थान शहापूर यांच्याकडे हार सुपूर्द केला त्यावेळी देवस्थान कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कुदळे, कार्यकारी अध्यक्ष गजानन गावडे, सेक्रेटरी अमित गावडे, ट्रस्टी मधुसूदन किनारी, गौरव अनगोळकर आदी उपस्थित होते.
अनगोळकर यांचे नांव फक्त वैश्यवाणी समाजातच नव्हे तर बेळगावातील दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये अग्रक्रमामध्ये येते.
देवीला हिऱ्यांचा हार अर्पण केल्याबद्दल श्री समादेवी संस्थान शहापूर आणि समस्त कार्यकारी मंडळातर्फे बापूसाहेब अनगोळकर यांना शतशः धन्यवाद देण्यात आले आहेत.