Sunday, May 19, 2024

/

वऱ्हाडी गाडी डंपरला आदळून दोन ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह: वऱ्हाड घेऊन निघालेला चेरवालेट बीट कारने डंपरला दिलेल्या धडके कार ब्लास्ट झाल्याने कार मध्ये बसलेल्या लहान मुलीसह दोन जण जागीच ठार तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बेळगाव तालुक्यातील देवगिरी क्रॉस जवळ बुधवारी सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

मोहन बेळगावकर वय 25 रा.बंबरर्गे, समीक्षा डेळेकर वय 12 रा. मच्छे बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्यांची नावे असून दोघा जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.Car accident

 belgaum

मिळालेल्या माहितीनुसार चेरवालेट बीट  पाच आसनी कार विवाह समारंभ आटोपून कंग्राळी खुर्द हून बंबरगे कडे जात होता त्यावेळी देवगिरी क्रॉस जवळ कार गाडीने डंपरला जोराची धडक दिली.

त्या धडकेत झालेल्या ब्लास्ट मध्ये बारा वर्षीय समीक्षा आणि मोहन यांचा घटनस्थळी  होरपळून मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे काकती पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलीस नेमका अपघात कसा झाला गाडीचा स्फोट कसा झाला याचा तपास करत आहेत.Krishna

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.