Sunday, September 1, 2024

/

महिलेशी असभ्यवर्तन; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महिलेशी असभ्यवर्तन केल्याच्या आरोपावरून त्या महिलेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे. डी. यांच्यावर कारवाई करताना त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

कर्तव्यात कसूर, बेशिस्तपणा आणि अधिकाराचा दुरुपयोग या कारणास्तव ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कांही दिवसांपूर्वी एक महिला संकेश्वर पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार करण्यास आली होती.

त्यावेळी रीतसर तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक नरसिंह राजू यांनी त्या महिलेची असभ्यवर्तन केले. त्याचप्रमाणे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी संपर्क साधनाद्वारे ते तिला जबरदस्तीने फिरायला घेऊन जात असत असे समजते.

त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिलेने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस उपनिरीक्षक नरसिंह राजू यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि अधिकाराचा दुरुपयोग केल्याच्या कारणास्तव निलंबनाची कारवाई केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.