Tuesday, May 7, 2024

/

रस्ते अपघातात एपीएमसी पोलीस जागीच ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह:काकती पोलीस ठाण्यापासून कांही अंतरावर घडलेल्या रस्ते अपघातामध्ये एपीएमसी पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली.

अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी पोलिसाचे नांव फकीरप्पा अर्जुन उप्पारट्टी (वय 35) असे असून तो मूळचा बैलहोंगल तालुक्यातील नावलगट्टी गावचा रहिवासी होता.

एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये आपले कर्तव्य बजावण्यासाठी जाण्याकरिता तो काल सोमवारी रात्री 11:30 वाजता रस्त्याकडेला थांबला होता.

 belgaum

त्यावेळी एका भरधाव दुचाकीने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की गंभीर दुखापत होऊन फकीरप्पा जागीच गतप्राण झाला. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.