Sunday, May 19, 2024

/

बेळगावच्या पोरी चक दे गर्ल्स!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाने नवा इतिहास घडवताना राज्य पातळीवरील पियूसी एसजीएफआय डिपार्टमेंटल फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. बेळगावच्या संघाने या पद्धतीने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे.

राज्य पातळीवरील पियूसी एसजीएफआय डिपार्टमेंटल स्पोर्ट्स 2023 -24 हा क्रीडा महोत्सव नुकताच यशस्वीरित्या पार पडला. या महोत्सवातील 19 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावचा संघ अजिंक्य ठरला.

स्पर्धेतील ‘उत्कृष्ट रक्षक’ हा पुरस्कार बेळगाव मुलींच्या संघाची गोलरक्षक लक्ष्मी कांबळे हिला प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे स्पर्धेतील ‘सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू’ हा पुरस्कार बेळगावच्या आलिशा बोर्जिस हिला मिळाला.Football

 belgaum

बेळगावच्या विजेत्या संघात ॲन्स्सीला एम. डिक्रुझ, अपर्णा हरेर, तनिषा सालगुडी, अलिषा बोर्जिस, लक्ष्मी कांबळे, दिव्या गौर, मंजुषा पाटील, भूमी नाटेकर, स्नेहा भेंडीगिरी, दिशा डोंगरे, विभावरी देसाई, रितू पाटील, मानसी चरणकर, आकांक्षा कटांबळे, स्वरा अजनकर, अनुष्का गौरण्णा, समृद्धी हावळ व कुंजल जाधव यांचा समावेश आहे.

मानस कुमार नायक हे या संघाचे प्रशिक्षक आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यामुळे बेळगावचा हा संघ आता पंजाबमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेणार आहे. सदर यशाबद्दल बेळगाव संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.