बेळगाव लाईव्ह विशेष:1893 सालचा तो काळ जेंव्हा अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषद भरली असताना एका भगव्या वेषधारी भारतीय युवकाने म्हणजे स्वामी विवेकानंदांनी वैश्विक बंधुत्वाची संकल्पना मांडली आणि त्याच्या स्वागतार्ह सभागृहात टाळ्यांचा कडकडाट गुंजत राहिला. भारतीय संस्कृतीचा हा वारसा जपत आपल्या कर्तुत्वाने त्याच शिकागो येथील भूमीवर अनेक भारतीय युवक आपल्या देशाचा तिरंगा सन्मानाने फडकवत आहेत. 11 सप्टेंबर रोजी बरोबर 130 वर्षानंतर त्या युवकांपैकी बेळगावच्या एका युवकाची यशोगाथा बेळगाव लाईव्हतर्फे मांडत आहोत. त्या युवकाचे नांव आहे कॅलिफोर्निया स्थित अभियंता रोहित रमेशराव देसाई…
मूळचे खानापूर तालुक्यातील कापोली गावचे रहिवासी असलेले अभियंता रोहित देसाई यांचे आई-वडील वगैरे कुटुंबीय सध्या हनुमाननगर बेळगाव येथील रहिवासी आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सध्या वास्तव्यास असलेल्या रोहित देसाई यांचे पहिली ते तिसरी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या वनिता विद्यालय शाळेमध्ये झाले. मात्र आपल्या मराठी मातृभाषेवर प्रेम असलेल्या रमेशराव देसाई यांनी आपल्या मुलाला म्हणजे रोहित यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळेत दाखल केले. त्या ठिकाणी रोहित यांचे इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर टिळकवाडीतील जीएसएस कॉलेजमधून पदवी पूर्व शिक्षण पूर्ण करणाऱ्या रोहित यांनी गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्प्युटर सायन्स मधील बीई पदवी संपादन केली. पुढे त्यांनी केली अमेरिकेतील शिकागो येथील इलीनाॅईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून एमएस अभ्यासक्रम मोठ्या गुणवत्ते पूर्ण केला. याखेरीज रोहित यांची प्रतिभा लक्षात घेऊन इलीनाॅईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेने डिजिटल तंत्रज्ञानामध्ये 2018 -19 सालच्या अभ्यासक्रमातील सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना ‘आऊटस्टँडिंग स्टुडन्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. रोहित रमेशराव देसाई हे सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या पश्चिम किनाऱ्यावरील वॉक्सवागेन येथे आपल्या पत्नी समवेत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. रोहित यांची पत्नी मिथाली देसाई यादेखील अभियंता असून संगणक विज्ञानातील एमएस पदवीधर आहेत.
रोहित देसाई हे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील असून त्यांचे वडील रमेश राव देसाई हे पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत त्यांची आई मीना रमेशराव देसाई यादेखील पेशाने शिक्षक असून देवरवाडी (ता. जि. कोल्हापूर) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवानिवृत्त झाले आहेत. रोहित यांचा लहान भाऊ रोहन हा देखील अभियंता असून तो आपल्या वडिलांसमवेत बॉक्साइट रोडवरील आधुनिक सायकल स्टुडिओ या ठिकाणी सायकलींचा व्यवसाय सांभाळतो.
आपल्या यशा संदर्भात बोलताना रोहित देसाई म्हणतात की अमेरिकेत मला स्थिरस्थावर होण्यासाठी त्या ठिकाणी पूर्वीच स्थायिक झालेल्या माझ्या मित्रमंडळींनी मोठे सहकार्य केले. मी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी मंगळूर, उडपी, मुंबई वगैरे भारतातील विविध प्रांतात अनेक भारतीय वास्तव्यास आहेत. एकमेकांच्या अडचणीच्या वेळी धावून जात एकमेकांना मदत करण्याद्वारे आम्ही सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहतो. त्यामुळे अमेरिकेतील वातावरणाशी जुळवून घेण्यास आपल्याला फारसे कष्ट पडले नाहीत असे देसाई सांगतात. विदेशात असले तरी रोहित देसाई यांची नाळ आपल्या मातृभूमीशी आपल्या मुळ गावाशी जोडलेली आहे. बेळगाव लाईव्हशी बोलताना ते म्हणाले की, आपण कितीही मोठे झालो तरी प्रत्येकाने आपले मूळ विसरता कामा नये. बेळगाव बद्दलच्या आपल्या अनेक गोड आठवणी आहेत. आजही मला बेळगावचा भुईकोट किल्ला, येळ्ळूरचा राजहंस गड, श्री कपिलेश्वर मंदिर, अरगन तलाव वगैरे आठवतात. विशेष करून अमेरिकेमध्ये बेळगावचा सुप्रसिद्ध ‘कुंदा’ आणि तोंडाला पाणी सुटणारा रुचकर पोह्याचा ‘अलिपाक’ यांना आपण मुकत असल्याचे सांगून आपला भारत देश झपाट्याने विकसित होणारा देश आहे आणि लवकरच तो जगातील सर्वात विकसित देशांमध्ये आपले स्थान निर्माण करेल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर प्रचंड लोकसंख्येचे ओझे हे भारताच्या विकासामधील महत्त्वाचा अडथळा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अमेरिकेची लोकसंख्या कमी असल्यामुळे तेथे सर्वांगीण विकासाला वाव आहे. त्यामुळेच अमेरिका विकासाच्या बाबतीत भारतापेक्षा 100 वर्षे पुढे आहे. मात्र भारतीय संस्कृती, विभिन्न सण -उत्सव ज्येष्ठांबद्दल असलेला आदर, प्रेम आणि देश बांधवता याला जगात तोड नाही. आमची परंपरा आणि संस्कृती जपण्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. अमेरिकन समाजात एकत्र कुटुंब पद्धती नाही. मात्र आम्ही भारतीय आमच्या संस्कृती आणि परंपरेचा आदर करत आजही एकत्र प्रेमाने राहतो. त्यामुळेच आमच्यामध्ये अधिक माणुसकी आणि इतरांना सहकार्य व मदत करण्याची वृत्ती आहे. अमेरिकेची स्तुती करताना रोहित देसाई आपण राहत असलेल्या इलीनाॅईस, शिकोगा यांचा उल्लेख करत शिकोगा हे तेच ठिकाण आहे, ज्या ठिकाणी 130 वर्षांपूर्वी आयोजित जागतिक धर्म संसदेच्या परिषदेमध्ये भगव्या वेशातील स्वामी विवेकानंदांनी हजेरी लावली होती. माझ्या बंधू -भगिनींनो अशी आपल्या भाषणाची सुरुवात करणारे जगातील पहिले वक्ते असलेल्या स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी सर्वप्रथम वैश्विक बंधुत्वाची संकल्पना मांडली होती. 1893 साली सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 11 ते 27 सप्टेंबर कालावधीत ही परिषद झाली होती आणि म्हणूनच त्या स्मरणार्थ अमेरिकन लोकांनी येथील एका रस्त्याचे ‘द स्वामी विवेकानंद मार्ग’ असे नामकरण केले आहे. जगातील प्रगत देशांमध्ये माझ्या देशाने स्थान मिळवावे यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यास तयार आहे. यासाठी सर्वप्रथम दर्जेदार प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या कापोली या मूळ गावात असलेल्या मराठी शाळेतील मुलांना शैक्षणिक मदत करत असतो.
या पद्धतीने बेळगाव लाईव्हकडे आपले मन खुले करताना अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित अभियंता रोहित रमेशराव देसाई यांनी जीवनातील आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांसह शाळा महाविद्यालयातील आपल्या गुरुजनांना दिले. या सर्वांचे मार्गदर्शन पाठिंबा मिळाला नसता तर अमेरिकेत जाऊन यशस्वी होण्याचे आपले स्वप्न साकार झाले नसते असे त्यांनी नमूद केले. परदेशात जाऊन बेळगावचा नावलौकिक वाढविण्याबरोबरच दिलखुलासपणे आपले विचार व्यक्त केल्याबद्दल बेळगाव लाईव्ह अभियंता रोहित देसाई यांचा आभारी आहे. त्यांच्या दृढनिश्चय आणि सळसळत्या चैतन्याला सलाम. त्यांच्यासह समस्त देसाई कुटुंबीयांना आणखी उत्तुंग यश व भरभराटीसाठी टीम बेळगाव live कडून हार्दिक शुभेच्छा!
“One should never forget his roots” – Er. Rohit Desai.
BELGAUM LIVE: A place or town or city comes into limelight on the basis of the achievements of its citizens. Non-resident Indian (NRI’s) citizens of Belgaum, the second capital of the state of Karnataka, in India, who have settled abroad due to their profession or business, have made the city proud by their achievements, and have kept the flag fluttering high, in which ever country or place they are working or residing around the world. Acknowledging & high-lighting the achievements of these sons & daughters of the soil, to the local population back home, is the weekly series “SAMUDRA-PAAR BELGAO” literally meaning in Marathi language, “Belgaum Across-Oceans”, by BELGAUM LIVE, a local Marathi daily digital news channel with a large subscriber base & readership across various social media platforms. The ever-enterprising NRI community from Belgaum, have made the city proud by their achievements & success in various fields such as Education, Sports, Literature, Culture, Medicine, Technology, Fashion, etc.. On 11th September,1893, in Chicago, when the ‘World Congress Of Religions’ was held, a saffron-clad Indian youth proposed the idea of universal brotherhood, and the applause continued for sometime. This saffron-clad youth was none other than the one and only The Great Swami Vivekananda. Exactly 130 years later, many young people are still working today on the same land of Chicago, carrying on the legacy of the great Indian Culture. ‘Belgaum Live’ is proud to present the success story of one such youth and son of the soil Er. Rohit Rameshrao Desai.
Er. Rohit Desai, originally hails from Kapoli, a small village in Khanapur Taluka of Belgaum District and presently his parents and family are residents of Hanuman Nagar, Belgaum. He is presently living in California, in the Unites States Of America. He did his primary schooling from the first to the third standard in English medium at Vanita Vidyalay school, Belgaum, and due to the strong belief of his father in the concept of schooling in ones own mother toungue, shifted to marathi medium and completed his secondary schooling from the fourth standard to the tenth standard at Marathi Vidyaniketan run by the Dakshin Maharashtra Shikshan Mandal, Belgaum. He did his PUC I & II from GSS College, Tilakwadi, Belgaum. He graduated & completed his BE in Computer Science at The Gogte Institute Of Technology, in Udyambag, Belgaum. Further he completed his MS from The Illinois Institute of Technology in Chicago, Illinois, USA. Highlight of his educational career was when he was honoured by The Illinois Institute Of Technology, with the ‘Outstanding Student Of The Year Award’ for being the outstanding student in Digital Systems Technology Curriculum for the academic year 2018-19. His Parents too were felicitated by the institute. He is presently working as an Engineer at Volkswagen on the west-coast in California, in the Unites States Of America, along with his wife Mithali Rohit Desai, who too is an engineer and MS in Computer Science.
Rohit Desai hails from a middle class Marathi family, and his father Mr. Rameshrao Desai has retired as a Principal from the Pandit Nehru PU College, Belgaum. His mother Mrs. Meena Rameshrao Desai too is from the teaching profession and has retired as a Head-Mistress from the Government Primary School, Devarwadi in Chandgad taluka, of Kolhapur District, which is just adjoining Belgaum district across the boundry in Maharastra state. His younger brother Rohan, who is an engineer too, along with his father, runs a business of dealing in cycles, at a very modern Cycle Studio, on the Bauxite road in Belgaum.
Rohit says “My friends, who were already in America before me, helped me a lot in getting to America and setting myself up here. And in my college here, there were a lot of students from Mangalore, Udupi, Mumbai, etc.. and we all Indians lived like a family, with each-others help and support, and hence did not face much difficulty in adjusting to the American environment”
He says that he had gone to Boston for doing his project and was staying with a Granny whose name was Sandra. And this Granny had a lot of love and respect for India and Indians. She had embraced Buddhism as her religion. She had visited India seventeen times and visited many pilgrimage centres in India. Even in his college at the Illinois Institute of Technolgy, his professors loved him and respected him a lot for being an Indian, and it was because of their guidance that he could become the ‘Outstanding Student Of The Year’.
Rohit Desai’s umblical cord is very much connected with his motherland and home-town. While speaking to ‘Belgaum Live’ he says “one should never forget his roots”. He misses Belgaum a lot. He has very fond memories of Belgaum and very vividly remembers the Belgaum Fort, the Rajhunsgad fort at Yellur, the Kapileshwar Temple, the Argan Talav lake on the Hindalga road, etc.. and he makes a very special mention of the very pleasant climate which is very exclusive to Belgaum. He particularly misses Belgaums’ most famous sweet dish ‘Kunda’ and ‘Ale-Paak’ which is a perfect tasty blend of puffed rice & beaten rice (Poha) with coconut shreddings and chilly and coriander with lime squeezed with a very mild special spice additive, that gives it that very mouth-watering taste.
He says India is a very fast developing country & very soon will be ranked amongst the top developed nations of the world. He says the major impediment for India’s development is the huge population, which is a great burden on the government and hinderance to development. He says the developed countries like America are very scantily populated when compared to India, which in a sense is an advantage for development.
He says America is 100 years ahead of India. But he says the culture, the various festivals, the respect and love for elders and fellow countrymen is great. We take great pride in retaining & maintaining our traditions and great culture. There is no joint family-system amongst Americans. Because of our culture and traditions, we as Indians, respect and love each other. That is the reason we have more of humanity and an attitude of co-operation and help. He also has a lot of praise for America, since he lived in Illinois, Chicago and he says Chicago is the place where Swami Vivekananda attended the ‘World Congress’ at the ‘Parliament Of World’s Religions’, exactly 130 years ago, this week from 11th -27th September, 1893, and the Americans have named a road in his honour and memory called ‘THE SWAMI VIVEKANAND MARG’.
While speaking to ‘Belgaum Live” he further says “I am ready to do anything that it takes, in my capacity to see that one day my country is counted amongst the developed nations of the world. And I feel, the impetus and priority should be given to primary education first and I am contributing my bit by providing and helping students of the Marathi school in my native village Kapoli, with books & educational materials. He attributes his success to his school & college teachers in India and very specially for the support of his parents & family, without whose help it would have not been possible for him to achieve his dream of going to America.
For raising the name of Belgaum to greater heights, we at ‘BELGAUM LIVE’ thank Er. Rohit Desai, for talking to us & sharing his thoughts & his inspiring words, and salute his determination & spirit, & wish him & the Desai Family, all the best and all success.
-Team ‘BELGAUM LIVE’.