बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव शहर आणि बेळगाव तालुक्यात शनिवारी (जुलै 05) मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश शहर पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी जारी केले आहेत.
बेळगाव शहरात मोहरम सणाचा शेवटचा दिवस मिरवणुकीचा आहे, त्यामुळे मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू नयेत यासाठी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
शनिवार, जुलै 05 रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विक्रीची दुकाने, बार/रेस्तराँ, क्लब आणि स्टॉक डेपो यांना पुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जर या आदेशाचे उल्लंघन केले गेले, तर संबंधितांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आदेशात नमूद केले आहे.