belgaum

बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याच्या त्रिभाजन करण्याचे वक्तव्य केले होते त्यानुसार कर्नाटक सरकार सध्या बेळगाव जिल्ह्याचे गोकाक व चिक्कोडी अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्याचा विचार करत असून यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर कर्नाटकातील आमदारांची बैठकही पार पडली आहे.

बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वसमावेशक सर्वांगीण विकासासाठी सरकार बांधील आहे. त्या अनुषंगाने ठराविक कार्यकाळात अनेक नवे प्रकल्प सूत्रबद्धपणे लागू केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव जिल्ह्याचे तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात विभाजनाचा प्रस्ताव हा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रशासकीय दृष्टीने मांडलेला मुद्दा चर्चेचा विषय आहे. तथापी यासंदर्भात आत्ताच अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळे बेळगावच्या विभाजनाबद्दल जनतेने काळजी करण्याची गरज नाही असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.District division

अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक सल्लामसलत केली जाईल. बेळगाव जिल्हा विभाजनाचा निर्णय लांबणीवर टाकल्यामुळे या संदर्भातील सर्व मुद्दे लक्षात घेण्यास आणि परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक सरकार सध्या बेळगाव जिल्ह्याचे गोकाक व चिक्कोडी अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्याचा विचार करत आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजी बेळगावमध्ये त्यांनी तशी घोषणाही केली आहे. आता यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर कर्नाटकातील आमदारांची बैठक पार पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.