Monday, May 20, 2024

/

प्रबोधनाचा वसा जपणारे शतायुषी गणेशोत्सव मंडळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पुणे येथे 1894 मध्ये देशातील पहिल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर 1905 मध्ये बेळगाव शहरातील पहिल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ मार्केट, झेंडा चौक येथे लोकमान्य टिळकांच्या हस्ते रोवली गेली. तेंव्हापासून गेली 119 वर्षे मार्केट, झेंडा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विना डॉल्बी, विना फटाके गणेशोत्सव साजरा करत प्रबोधनाचा वसा जपत आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागृती व संघटन करण्यासाठी 1894 साली पुण्यामध्ये सुरू केलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची कल्पना स्वातंत्र्यलढ्यात उतरलेल्या बेळगाव येथील नागरिकांना आवडली. त्यांच्या पुढाकाराने लोकमान्य टिळकांच्या हस्ते शहरातील कांदा मार्केट येथील विष्णू पाटणेकर यांच्या धान्य दुकानात 2 सप्टेंबर 1905 रोजी बेळगावातील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

गोविंदराव याळगी, विष्णू पाटणेकर, गोपाळ पाटणेकर, रामचंद्र मुरकुंबी, शंकर कलघटगी, वामन कलघटगी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यावेळी टिळकांच्या हस्ते शाडूच्या श्रीमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेंव्हा बेळगाव मार्केट येथील पाटणेकर यांच्या दुकानात सुरू झालेला सार्वजनिक श्री गणेशोत्सव त्यानंतर दरवर्षी साजरा होऊ लागला.Zenda chouk

 belgaum

कालांतराने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर कार्यक्रम होऊ लागले. प्रारंभी म्हणजे 1953 सालापर्यंत पाटणेकर यांच्या दुकानात गणेशोत्सव साजरा केला जात होता, मात्र त्यानंतर तो दुकानाबाहेर मोकळ्या जागेत साजरा होऊ लागला.

1980 पासून गणेशोत्सव मंडळाची श्रीमूर्ती जवळच असलेल्या झेंडा चौक येथे प्रतिष्ठापना करण्याचा प्रघात सुरू झाला. या पद्धतीने गेल्या 119 वर्षाच्या प्रवासात बेळगाव मार्केट येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची परंपरा कधीच खंडित झाले नाही. मंडळाची शतकपूर्ती होताच लोकांकडून वर्गणी गोळा करणे बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या 20 वर्षांपासून शरीर सौष्ठव स्पर्धा आणि 8 वर्षांपासून करेला स्पर्धा आयोजित केली जाते.

याव्यतिरिक्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्याबरोबरच गायन, नृत्य आदी सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मार्केट, झेंडा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची विद्यमान कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.  बुधवारी 6 सप्टेंबर रोजी मंडपाची मुहूर्तमेढ करण्यात आली.

Zenda chouk ganesh mandal
File pic: बेळगाव live ने देखील या मंडळाचा चार वर्षापूर्वी विधायक गणेश मंडळ म्हणून केला होता सत्कार

येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शतकोत्तर परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरातील या पहिल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम नुकताच विधिवत उत्साहात पार पडला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेदार, सिक्रेटरी राजू हंगिरगेकर, खजिनदार अजित सिद्दण्णावर, संचालक विकास कलघटगी,शुभम कलघटगी आदी उपस्थित होते.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.