Wednesday, May 8, 2024

/

बेळगाव जेल मधील यांच्यावर कारवाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जेल मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन गेल्यापासून देशात चर्चेत आलेल्या आणि उत्तर कर्नाटकामधील मोठं कारागृह समजल्या जाणाऱ्या हिंडलगा कारागृहातील दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

कर्त्यव्यात कसूर केल्या प्रकरणी हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

प्रमुख वार्डर बी एल मेळवंकी वार्डर व्हि टी वाघमोरे या दोघांना कारागृहाचे उपमहानिरीक्षक उत्तर विभाग टी पी शेष यांनी निलंबित केले आहे.निलंबित आरोपीवर काराहगृहातील कैद्यांचा छळ करणे आणी सशुल्क कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी देण्याचे आरोप आहेत.

 belgaum

अलीकडेच कारागृहात कैद्यांनी परस्पर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन निलंबचा आदेश जारी करण्यात आला आहे.

त्याचं वेळी कारागृहतील कैद्यांकडून मोबाईल फोन वापरन्याबाबत चौकशी सुरू असून ए डी जी पी मालिनी कृष्णमूर्ती यांनी कारागृह उपमहानिरीक्षक उतर विभाग टी पी शेष यांना प्राथमिक तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.