बेळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र असमाधानकारक पाऊस पडला असून गेल्या 1 जानेवारी 2023 पासून काल बुधवारी 16 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये रायबाग तालुका वगळता इतरत्र सर्व ठिकाणी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. बेळगाव शहरासह तालुक्यात आत्तापर्यंत सरासरी 1136.0 मि.मी. पाऊस पडलेला असतो. मात्र यंदा फक्त 628.5 मि.मी. पाऊस झाला आहे. हीच गत खानापूर तालुक्याची असून येथे कालपर्यंत सरासरीपेक्षा 636.5 मि. मी. कमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात दरवर्षी 1 जानेवारीपासून 16 ऑगस्टपर्यंत सरासरी 272.0 मि.मी. पावसाची नोंद होते. मात्र यंदा या तालुक्यात 285.8 मि.मी. पाऊस म्हणजे 13.8 मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. कालपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील विविध पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे तालुका मुख्यालय पर्जन्यमापन केंद्र, ऑगस्ट मधील सर्वसामान्य पाऊस, प्रत्यक्ष पडलेला पाऊस, आणि प्रमाणातील फरक यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : ऑगस्ट मधील सर्वसामान्य पाऊस 53.0 मि.मी., प्रत्यक्ष पडलेला पाऊस 10.2 मि.मी., प्रमाणातील फरक -42.8 मि.मी.. बैलहोंगल आयबी : 83.0 मि.मी., 16.4 मि.मी., -66.6 मि.मी.. बेळगाव आयबी : 273.0 मि.मी., 43.3 मि.मी., -229.7 मि.मी.. चिक्कोडी : 97.0 मि.मी., 20.0 मि.मी., -77 मि.मी.. गोकाक : 52.0 मि.मी., 6.2 मि.मी., -45.8 मि.मी.. हुक्केरी एसएफ : 89.0 मि.मी., 11.2 मि.मी., -77.8 मि.मी.. कागवाड (शेडबाळ) : 66.1 मि.मी., 5.0 मि.मी., -61.1 मि.मी.. खानापूर : 412.0 मि.मी., 55.9 मि.मी., -356.1 मि.मी.. कित्तूर : 185.0 मि.मी., 6.6 मि.मी., -178.4 मि.मी.. मुडलगी : 57.3 मि.मी., 0.0 मि.मी., -57.3 मि.मी.. निप्पाणी आयबी : 154.3 मि.मी., 22.4 मि.मी., -131.9 मि.मी.. रायबाग : 54 मि.मी., 3.7 मि.मी., -50.3 मि.मी.. रामदुर्ग : 64.0 मि.मी., 7.7 मि.मी., -56.3 मि.मी.. सौंदत्ती : 60.0 मि.मी., 10.2 मि.मी., -49.8 मि.मी..
बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गेल्या 1 जानेवारी 2023 पासून काल बुधवारी 16 ऑगस्ट 2023 पर्यंत झालेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे तालुक्याचे नांव, सरासरी पाऊस, प्रत्यक्ष पडलेला पाऊस, कमी/जास्त फरक यानुसार) पुढील प्रमाणे आहे. अथणी : सरासरी पाऊस 277.0 मि.मी., प्रत्यक्ष पडलेला पाऊस 223.2 मि.मी., प्रमाणातील फरक -53.8 मि.मी.. बैलहोंगल : 428.0 मि.मी., 377.2 मि.मी., -50.8 मि.मी.. बेळगाव : 1136.0 मि.मी., 628.5 मि.मी., -507.5 मि.मी.. चिक्कोडी : 413.0 मि.मी., 321.0 मि.मी., -92.0 मि.मी.. गोकाक : 297.0 मि.मी., 264.3 मि.मी., -32.7 मि.मी.. हुक्केरी : 480.0 मि.मी., 250.4 मि.मी., -229.6 मि.मी.. कागवाड : 314.1 मि.मी.,
205.0 मि.मी., -109.1 मि.मी.. खानापूर : 1656.0 मि.मी., 1019.5 मि.मी., -636.5 मि.मी.. कित्तूर : 781.4 मि.मी., 508.0 मि.मी., -273.4 मि.मी.. मुडलगी : 300.8 मि.मी., 262.8 मि.मी., -38.0 मि.मी.. निप्पाणी : 602.5 मि.मी., 391.1 मि.मी., -211.4 मि.मी.. रायबाग : 272.0 मि.मी., 285.8 मि.मी., 13.8 मि.मी.. रामदुर्ग : 290.0 मि.मी., 219.4 मि.मी., -70.6 मि.मी.. सौंदत्ती : 336.0 मि.मी., 259.2 मि.मी., -76.8 मि.मी..