Sunday, June 16, 2024

/

लग्नाच्या जेवणामुळे अन्न विषबाधा; 85 हुन अधिक अत्यवस्थ

 belgaum

बेळगाव लाईव्ह:चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील एका लग्न सोहळ्याच्या जेवणामुळे सुमारे 85 हून अधिक जणांना अन्न विषबाधा होऊन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अत्यवस्थ झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

लग्न सोहळ्यात अन्न विषबाधा झालेल्यांपैकी 65 रुग्णांना चिक्कोडी सरकारी इस्पितळात तर इतरांवर मिरजसह अन्य ठिकाणी खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिरेकोडी येथे काल सायंकाळी झाकीर पटेल यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला.

या लग्नसोहळ्यास हिरेकोडी गावासह, मिरज व इतर गावातील आप्तस्वकीय उपस्थित होते. लग्नाचे जेवण करून घरी परतलेल्यांपैकी 85 हुन अधिक जणांना आज सकाळी उलटी, जुलाब व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे चिक्कोडी सरकारी इस्पितळात 67 जणांना दाखल करण्यात आले आहे.Food poisining

 belgaum

तर कांही जणांना सदलगा व एकसंबा येथे उपचार सुरू आहेत. यापैकी अनेक जणांची स्थिती गंभीर असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर यांनी हिरेकोडी गावाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

त्याचप्रमाणे चिक्कोडी -सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी सरकारी इस्पितळाला भेट देऊन विषबाधा झालेल्यांची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांना योग्य उपचार करून विषबाधा झालेल्यांची काळजी घेण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.