गुरुवारी सकाळ पर्यंत धारवाड जवळ हायवे बंदच…वाहतूक पर्यायी मार्गाने
बुधवारी धारवाड जवळ गॅस टँकर पलटी झाल्याने बेळगाव कडून धारवाड कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती गुरुवारी सकाळी 8 पर्यंत देखील हायवे बंदच होता. सदर वाहतूक कधी खुली होणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र अंदाजे दुपारी बारा वाजेपर्यंत हायवे रहदारी साठी खुला व्हायची शक्यता आहे.
बुधवारी संध्याकाळी टँकर अपघातानंतर धारवाड उच्च न्यायालयाजवळील राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद आहे.
पर्यायी वाहतूक सुरू असलेला मार्ग
1)कित्तूर–तडकोड–गरग–धारवाड आणि शहराच्या हद्दीतून.
२)हिरेबागेवाडी–बैलहोंगल–बेलवडी–तडकोड–गरग–धारवाड.
3) संकेश्वर –हुक्केरी–घटप्रभा–गोकाक–यरगट्टी- – सौंदत्ती-धारवाड.
4)निप्पाणी–चिक्कोडी–हुक्केरी–घटप्रभा–गोकाक–यरगट्टी-सौंदत्ती–धारवाड.