Monday, May 13, 2024

/

विरोधांतर्गत भरा 75 टक्के वीज बिल -बीसीसीआय

 belgaum

अन्याय वीज दर वाढीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व औद्योगिक व्यापारी व अन्य संघटनांनी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) नेतृत्वाखाली नुकतीच हेस्कॉमच व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.

वीज दरवाढी संदर्भातील सदर भेटीच्या अनुषंगाने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकारीशी बैठक देखील झाली. बैठकीला हेस्कॉमचे एमडी मोहम्मद रोशन, अर्थ संचालक प्रकाश पाटील आणि बेळगाव विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश व्ही. उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी निश्चित शुल्क, ऊर्जा शुल्क आणि एफपीपीसीए आकारणी दरवाढ मूल्यांकनाच्या गंभीर परिणामाची माहिती दिली. अखेर सखोल चर्चेअंती सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि हेस्कॉम एमडी हे खालील निर्णयाप्रत पोहोचले.

जून 2023 मध्ये आलेले अवास्तव न परवडणारे वाढीव विजेचे बिल भरण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन वीज ग्राहकांना जून 2023 चे संपूर्ण बिल न भरता विरोधांतर्गत 75 टक्के बिल भरण्यास परवानगी द्यावी अशी केलेली विनंती हेस्कॉमच्या एमडींनी मान्य केली. जून 2023 मधील बिलाची उर्वरित 25 टक्के प्रलंबित रक्कम व्याज मुक्त स्थगित ठेवावी. ही स्थगिती 31 जुलैपर्यंत असावी. ज्यामुळे सदर कालावधी हेस्कॉमला योग्य पर्याय उपाय शोधण्यास वेळ मिळेल. प्रति युनिट एफपीपीसीएमध्ये जी 2.55 रुपये इतकी अवास्तव वाढ करण्यात आली आहे.

 belgaum

ती रद्द करावी असा प्रस्ताव हेस्कॉम एमडींसमोर मांडण्यात आला. तेंव्हा सदर बाब आपले वरिष्ठ आणि सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन एमडीनी दिले. वरील सर्व मुद्दे हे व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांसाठी (एचटी/एलटी) मांडण्यात आले होते. तसेच हे सर्व चर्चेचे मुद्दे होते.

दरम्यान, केईआरसीने घालून दिलेल्या नियमानुसारच विजेच्या बिलात वाढ करण्यात आली आहे. तसेच वाढीव वीज बिलासंबंधी सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे अशी माहिती देऊन तोवर सर्व वीज ग्राहकांनी आपले विज बील भरावे, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन यांनी केले. तसेच सध्याची दरवाढ कमी करण्यासाठी मला जितके शक्य आहे तितके प्रयत्न मी करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.