बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला असून पहिल्या टप्प्यात पाच हमी योजना लागू करण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरु केली आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थी ऑनलाईन अर्ज करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी या योजनेच्या अर्जासाठी रक्कम आकारण्यात येत असून यासाठी कोणतेही शुल्क नसल्याचे काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. काँग्रेस सरकारच्या योजना पूर्णपणे मोफत असून या योजनांसाठी काही जण सर्वसामान्यांकडून पैसे मागत आहेत. सरकारच्या पाच मोठ्या योजनांपैकी स्त्रीशक्ती योजना कार्यान्वित झाली आहे.
आता एकामागोमाग एक योजना कार्यान्वित होतील. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेच्या अर्जासाठी पैसे आकारण्यात येत असतील
तर आपण याबाबी तक्रार करावी, कोणत्याही एजंटच्या माध्यमातून सरकारला कोणत्याही योजनेसाठी पैसे मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली असून काँग्रेसच्या योजनांविषयी जर कुणाला माहिती हवी असल्यास त्यांनी नजीकच्या कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन प्रभावती मास्तमर्डी यांनी केले आहे.