Tuesday, July 23, 2024

/

रेल्वे कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशाचा शोध जारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जवळील लोंढा येथे चालुक्य एक्स्प्रेसमध्ये तिकीट दाखविण्यास सांगितल्यानंतर रेल्वे कोच अटेंडंटचा भोसकून निर्घृण खून करण्याबरोबरच तिकीट परीक्षकासह (टीटीई) तिघांना जखमी करणाऱ्या संशयिताचा सध्या व्यापक शोध सुरू आहे.

सदर खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी लोंढा रेल्वे स्थानकाजवळ घडली. बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी सांगितले की, जेव्हा प्रवाशाला त्याचे तिकीट दाखवण्याची विनंती करण्यात आली.

तेव्हा हिंस्र झालेल्या त्या संशयिताने चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने परिस्थिती झपाट्याने चिघळली. त्याप्रसंगी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेल्वे कोच अटेंडंटला दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला.

Railway

Railway

चाकू हल्ल्यात टीटीईच्या हातावर किरकोळ दुखापत झाली असून इतर दोघेही जखमी झाले. चाकू हल्ल्यानंतर संशयिताने खानापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मधून उडी मारली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी अनेक तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके लागलीच तैनात केली गेली असून संशयिताला लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त मारबानियांग यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.