Sunday, April 28, 2024

/

सुवर्णसौध प्रांगणात उभारणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमेच्या बांधकामाचे भूमिपूजन

 belgaum

बेळगाव : कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बेळगावमधील सुवर्णसौध समोर विविध महापुरुषांच्या प्रतिमा उभारण्यात येणार आहेत.

ज्या ज्या ठिकाणी या प्रतिमा उभारण्यात येणार आहेत त्या ठिकाणांची पाहणी काल करण्यात आली. आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बांधकामाचे भूमिपूजन पार पडले.

कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा सुवर्णसौध परिसरात उभारण्यात येणार आहेत.

 belgaum

हिवाळी अधिवेशनात या प्रतिमा उभारणीचे भूमिपूजन करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम पार पडला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर कागेरी – हेगडे, वि. प. सभापती बसवराज होरट्टी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण, सी. सी. पाटील, मुरुगेश निरानि, के. एस. ईश्वरप्पा, शशिकला जोल्ले यांच्यासह विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.