Daily Archives: Jun 23, 2023
बातम्या
मनपा आयुक्तपदी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती
बेळगाव महापालिका आयुक्त पदी के ए एस अधिकारी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या अधीन कार्यदर्शिनी शुक्रवारी हा नियुक्तीचा आदेश बजावला आहे. अशोक धुडगूंटी...
बातम्या
बेंगळुरूच्या धर्तीवर ‘बृहनबेळगाव’ जारकीहोळी यांच्या सूचना
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाची राजधानी असणाऱ्या बेंगळुरू शहराच्या आसपासची गावे बेंगळुरू महानगरपालिकेमध्ये विलीन करण्याद्वारे 'बृहत बेंगलोर' बनविण्यात आले आहे.
बृहतबेळगावच्या धर्तीवर आता बेळगाव शहर परिसरातील गावांचे बेळगाव महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण करून 'बृहनबेळगाव' बनविण्याच्या दृष्टीने योजना आखावी, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश...
बातम्या
भरपाई नकोच, जमिनीच हव्या : रिंगरोडबाबत शेतकरी ठाम
बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी संपादित करून आखण्यात आलेला रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र दुसरीकडे रिंग रोड साठी अनेक ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला...
बातम्या
पतीचा खून, बेपत्ता झाल्याची फिर्याद! पतीला यमसदनी धाडणारी पत्नी गजाआड!
बेळगाव लाईव्ह : अनैतिक संबंधातून एका विवाहितेने आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून करून तो बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतःच पोलीस ठाण्यात नोंदवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी त्या विवाहितेसह चौघाजणांना ताब्यात घेतले आहे.
स्वतःच्या पतीला यमसदनी...
बातम्या
भुतरामहट्टी प्राणिसंग्रहालयात नवा पाहुणा येणार
बेळगाव लाईव्ह : प्राणीप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या भूतरामहट्टी येथील मिनी प्राणिसंग्रहालयात नवी वाघीण दाखल होणार आहे, यामुळे प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी आणखी एक पर्वणी उपलब्ध होणार आहे.
सुमारे ३१.६८ हेक्टर प्रदेशात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात सिंह, बिबट्या, अस्वल, हायना, मोर, कबूतर, पोपट आणि...
बातम्या
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
बेळगाव लाईव्ह : २९ जून रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जनावरांची अनधिकृत हत्या किंवा तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, उत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे सक्तीने...
बातम्या
मुख्यमंत्री सिद्धरामय्या महाराष्ट्र दौऱ्यावर
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर, सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमात ते सहभाग घेणार असून पुणे बारामती होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते त्यांचा...
बातम्या
‘वंदे भारत’ बेळगावपर्यंत पोहोचण्यात तांत्रिक अडचणी : इराण्णा कडाडी
बेळगाव लाईव्ह : काही तांत्रिक अडचणींमुळे वंदे भारत रेल्वे सध्या तरी बेळगावपर्यंत पोहोचू शकत नसल्याची माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी आज (शुक्रवारी) शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.
धारवाड मार्गावर ताशी ११० कि.मी. वेगाने धावणाऱ्या या रेल्वेला...
बातम्या
निदर्शनं करत शेतकऱ्यांनी केली ही मागणी
वीज दरवाढ रद्द करण्याबरोबरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्यांचे निवेदन आज कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेने बेळगाव या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आणि जि. पं. सीईओंना सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य रयत...
बातम्या
टँकर पाणी पुरवठ्यासाठी सहकार्याचे आवाहन
सध्याच्या पाणी टंचाईवर मात करून गरजूंना टँकरने पाणी पुरवण्याची आमची योजना आहे. मात्र पाण्याच्या प्रति टँकरच्या वास्तव दरामुळे समस्या निर्माण झाली आहे. तरी आमच्या जनहितार्थ योजनेसाठी खाजगी पाणी पुरवठा करणाऱ्यांनी योग्य दरात आम्हाला टँकर उपलब्ध करून द्यावेत.
तसेच जागरूक नागरिकांनी...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...