belgaum

काकती (ता. जि. बेळगाव) येथील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी पॅरिस ओलंपिक 2024 च्या तयारीसाठी आयोजित वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनचा ॲडव्हान्स इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

तायक्वांदोवोन मुजू येथे गेल्या 8 ते 19 जून दरम्यान वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन व मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स कल्चर अँड टुरिझम, रिपब्लिक ऑफ कोरिया यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोरिया स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन व तायक्वांदो प्रमोशन फाउंडेशनच्या सहकार्याने वर्ल्ड तायक्वांदो पार्टनरशिप प्रोग्राम अंतर्गत पॅरिस ऑलंपिक 2024 च्या तयारीसाठी आयोजित ॲडव्हान्स इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कोर्ससाठी काकतीचे रहिवासी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव हे आंतरराष्ट्रीय मानकावर आधारित कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरले होते.

त्याचप्रकारे तायक्वांदो मास्टर राव यांच्या शिफारशीनुसार त्यांचे विद्यार्थी व सहाय्यक प्रशिक्षक स्वप्निल राजाराम पाटील आणि वैभव राजेश पाटील यांचाही या कोर्समध्ये सहभाग होता.

सदर कोर्समध्ये सेनेगल, कॉंगो, खजाकिस्तान, खिरकिस्तान, हॉंगकॉंग, चायना, अल्जेरिया, बांगलादेश, नेपाळ, अफगानीस्तानसह भारतातील जागतिक उच्च क्रमवारीवर आधारित 23 निवडक प्रशिक्षकांचा सहभाग होता. या कोर्समध्ये क्योरिगी कौशल्याबाबत प्रोफेसर ओह जिओंग ही ने, क्रीडा इजा प्रतिबंध बाबत प्रा. ओ सी योन ने, पोलिसांचे अटकेचे तंत्र इन्स्पेक्टर ओह योंग हून ने,Sports

तायक्वांडो जिम्नॅस्टिक बाबत प्रोफेसर शिन मी यांग ने, कोरियन सांस्कृतिक आणि पारंपरिक सत्र प्रा. चो यो हान ने, पूमसे प्रशिक्षण पद्धत प्रा यून सांग वोन ने, उच्चस्तरीय पूम्से प्रशिक्षण प्रा. पार्क ताय ह्युंग व कांग यू जिन, ब्रेकिंग आणि प्रात्यक्षिक नियम प्रा. की मी जीओंग ने तर क्योरुगी स्पर्धा नियम प्रा. शिम यांग ग्यून यांनी मार्गदर्शन केले.

कोर्सच्या समाप्तीनंतर चांचणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तायक्वांडो प्रशिक्षकांना वर्ल्ड तायक्वांडो एज्युकेशन डिपार्टमेंटचे प्रोफेसर चेओल मिन किम यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर आंतरराष्ट्रीय कोर्समध्ये सुयश मिळविलेल्या श्रीपाद रवी राव, स्वप्निल पाटील आणि वैभव पाटील या गुरु-शिष्य त्रिकुटाला बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच ॲड. प्रभाकर शेडबाळे व सचिव आं. रा. पंच महादेव मुतनाळे यांचे भरपूर प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले आहे. सदर तीनही यशस्वी तायक्वांडोपटूंचे काकतीवासीयांनी काल गुरुवारी गावात उस्फुर्त स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.