Sunday, July 14, 2024

/

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : २९ जून रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्ताने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जनावरांची अनधिकृत हत्या किंवा तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, उत्सव साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.

बकरी ईद दरम्यान गायी, उंटांसह जनावरांची अनधिकृतपणे होणारी कत्तल रोखण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत, प्राण्यांची सामूहिक हत्या रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमानुसार कार्यवाही करावी.

अवैधरित्या होणारी जनावरांची तस्करी आणि सामूहिक कत्तलीवर लक्ष ठेवावी, याबाबत योग्य माहिती देऊन लोकांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

महापालिकेच्या अखत्यारीतील दोन कत्तलखाने बकरी ईदच्या काळात वापरण्याची सोय केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. सभेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बकरी ईद दरम्यान कोणतेही अनधिकृत काम करू देणार नाही, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण उत्साहात साजरा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच ज्या ठिकाणी सामूहिक प्रार्थना होते त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. बकरी ईद काळात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देताना, जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.