Friday, April 19, 2024

/

ट्रॅफिक जाम!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेळगावमध्ये तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र टिळकवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थेच असल्याचे निदर्शनात येत आहे.

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटनजीक सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. आज सायंकाळी रेल्वे क्रॉसिंग दरम्यान एक रेल्वे फाटकावरच थांबून राहिल्याने या भागात बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रॉसिंगसाठी टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेट नजीक एक रेल्वे येऊन थांबली.

दरम्यान बेळगावहून खानापूरच्या दिशेने जाणारी आणि खानापूरहून बेळगावच्या दिशेने येणारी अशा एकूण दोन रेल्वे निघून गेल्या.Traffic jaam

 belgaum

मात्र टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटनजीक थांबलेली रेल्वे बराच वेळ त्याचठिकाणी थांबल्याने पहिल्या रेल्वेगेटनजीक मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सायंकाळी कामातून परतणाऱ्या नागरिकांची देखील हीच वेळ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.