belgaum

शुक्रवार पेठ, टिळकवाडी हा पहिल्या रेल्वे गेट कडून गोवावेसकडे जाणारा रस्ता स्विमिंग पूल जवळ ज्या ठिकाणी खानापूर रोडला मिळतो त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी वाहतूक नियंत्रण करून रहदारी पोलिसांना मदत केली.

शुक्रवार पेठ टिळकवाडी हा पहिल्या रेल्वे गेट कडून गोवावेसकडे जाणारा रस्ता स्विमिंग पूल जवळ ज्या ठिकाणी खानापूर रोडला मिळतो त्या ठिकाणी काही वेळेला वाहतुकीची कोंडी होते. खानापूर रोडवरील सततच्या रहदारीमुळे शहापूरकडून पहिले गेट टिळकवाडीकडे येणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना बऱ्याच काळ रस्त्याच्या मधोमध तिष्ठत थांबावे लागते.

गोवावेस सर्कल येथे वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या रहदारी पोलिसांना या ठिकाणच्या वाहतूक नियंत्रणाकडे लक्ष देणे कठीण जाते.Traffic police

ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले आज सोमवारी पुन्हा एकदा गोवावेस येथील रहदारी पोलिसांच्या मदतीला धावले. त्यांनी गोवावेस स्विमिंग पूलच्या प्रवेशद्वारा समोरील खानापूर रोड वरील वाहतूक नियंत्रित केली.

यासाठी रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेड लावून प्रसाद चौगुले यांनी वाहतूक सुरळीत केली. या पद्धतीने स्वयंस्फूर्तीने मदत केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी प्रसाद चौगुले यांचे अभिनंदन करून आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या या कार्याची ये-जा करणारे वाहन चालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रशंसा होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.