बेळगाव लाईव्ह : वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणखी 200 ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) कॅमेरे बसवण्यासाठी बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयाने निविदा मागविल्या आहेत.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने बेळगाव जिल्ह्यातील ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सॉफ्टवेअर (एएनपीआर) कॅमेरा आणि लेन शिस्तीच्या आयटीएमएसचा पुरवठा, स्थापना आणि सर्वसमावेशक देखभाल यासाठी निविदा काढली असून होनगा, सुवर्ण सौध जवळील परिसर, हिरेबागेवाडीपासून ५ कि.मी, हिरेबागेवाडीपासून अंबडगट्टी १९ किमी, तेगूर बेळगाव-धारवाड सीमा आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
एएनपीआर प्रणाली अचूक वाहन क्रमांक प्लेट्स कॅप्चर करण्यासाठी AI-DL प्लॅटफॉर्मवर काम करेल. ही प्रणाली ऑपरेटिंग सिस्टम अग्नोस्टिक प्लॅटफॉर्मवर विकसित आणि तयार केली जाईल, शिवाय हि प्रणाली सर्व्हर आणि स्टोरेज सोल्यूशन्सवर कार्य करणार आहे. सिस्टीम व्हिडिओ डिटेक्शन वापरून कॅमेरा व्ह्यूमध्ये वाहन स्वयंचलितपणे शोधून नंबर प्लेटची ओळख पटवू शकेल.
कार, हेवी कमर्शिअल व्हेईकल, थ्री व्हीलर आणि टू व्हीलर यांसारख्या वाहनांच्या वर्गांसाठी स्टॅंडर्ड फॉन्ट आणि फॉरमॅटमध्ये इंग्रजी अल्फा न्यूमेरिक लायसन्स प्लेट शोधण्यात आणि ओळखण्यास सिस्टम सक्षम असेल.
याचप्रमाणे नंबर प्लेट नसलेली वाहने देखील शोधून वाहनाच्या व्हिडिओ आणि स्नॅपशॉटसह अलर्ट देखील देईल. एएनपीआर प्रणालीमुळे भविष्यात बेळगावमध्ये विविध ठिकाणी एएनपीआर कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीला शिस्त लागेल अशी आशा आहे.