Thursday, December 5, 2024

/

चलो मुंबई आंदोलनाची तयारी पूर्ण समिती नेत्यांकडून पाहणी

 belgaum

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (दि. २८) मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि. २४) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी पाहणी केली. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे करण्यात आली.

आंदोलनाची तयारी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी मुंबई येथे दाखल झाले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या विविध शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे. त्याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विकास कलघटगी आर. आय. पाटील, ऍड. एम. जी. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सुनील अष्टेकर उपस्थीत होते.

शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक सुरेश माने, सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांचे विशेष अधिकारी अनिल जगताप यांच्या समवेत आझाद मैदान येथे जाऊन पाहणी केली. यावेळी आंदोलनात किती कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासह इतर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.Chalo mumbai

त्याचबरोबर विविध पक्षांचे नेते व संघटनाची भेट घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे.

टोल माफीवर आज निर्णय
सीमा भागातून आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना टोल फ्री करावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याबाबत शनिवारी (दि. २५) निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रवास करणे सोपे होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.