Saturday, May 11, 2024

/

भीषण अपघात : सख्या भावांचा दुर्दैवी अंत

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दुचाकीवरून जात असताना दुचाकीला कारची धडक बसल्याने दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिकोडी तालुक्यातील बेळकुड गेट येथे बुधवारी (दि. १५) दुपारी घडली आहे.

चिकोडी तालुक्यातील नवलिहाळ येथील शिवकुमार राजू घोसे ( वय 25) व त्याचा भाऊ अश्विनकुमार राजू घोसे ( वय 23) अशी मृतांची नावे आहेत.

चिकोडी तालुक्यातील नवलिहाळ येथून दोघे भाऊ दुचाकीने गोकाक तालुक्यातील शिंदीकुरबेटच्या दिशेने जात होते. याचवेळी कब्बूरकडून चिकोडीकडे जाणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्यासाठी मार्ग काढताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली.

 belgaum

आणि या धडकेत दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चिकोडी पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.