belgaum

बेळगाव लाईव्ह : फिटनेस आणि वेलनेस उद्योगातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रामाणिक व्यक्तींच्या सन्मानार्थ ‘कोएलिशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल्स ऑफ इंडिया’द्वारे आयोजित फिटनेस अँड वेलनेस अवॉर्ड्स 2023 या पुरस्काराने बेळगावमधील राहुल गीते यांना सन्मानित करण्यात आले.

bg

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला इंडियन रजिस्टर फॉर एक्सरसाइज फॅसिलिटीज (आयआरईएफ) आणि स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन फिटनेस अँड लीझर स्किल्स कौन्सिल (एसपीईएफएल-एससी) द्वारे देखील समर्थन मिळाले आहे.

राहुल रमेश गीतेचे शालेय शिक्षण सेंट पॉल हायस्कूलमध्ये झाले असून बेळगावच्या जैन महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे.Rahul geete

विविध कला जोपासणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या राहुल गीते यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली असून राहुल गीते यांनी २०१० पासून या क्षेत्रातील करियरला सुरुवात केली आहे.

सहाय्यक नृत्यदिग्दर्शक ते स्वतःचा डान्स स्टुडिओ असा प्रवास करणाऱ्या राहुल गीते यांना सन्मानित करण्यात आलेल्या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.