Friday, March 29, 2024

/

सायबर फसवणूक : बेळगावच्या उद्योजकाला 38 लाखाला टोपी

 belgaum

मोबाईल कॉलवर सुसंस्कृतपणे बोलण्याद्वारे विश्वास संपादन करून एका उद्योजकाची 38 लाख रुपयांची लुबाडणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच शहरात उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगा एव्हिएशन कंपनीच्या मालकांना एका भामट्याचा फोन आला. त्याने फोनवर आपला परिचय मेजर कुलदीप सिंग, इंडियन आर्मी असा करून दिला. तसेच लष्कराला कांही सिक्युरिटी केबीन्सची गरज असून ती लष्कराच्या मानकानुसार (स्टॅंडर्ड) कांही अटी व नियम पाळून बनवली गेली पाहिजेत असेही त्याने स्पष्ट केले. त्याने सांगितलेल्या अटींपैकी एका अटीनुसार वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वी विक्रेत्याला लष्कराकडे ठराविक रक्कम सिक्युरिटी डिपॉझिटच्या स्वरूपात जमा करावी लागणार होती.

सिक्युरिटी केबिन्स तयार करून दिल्यानंतर विक्रेत्याला त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटसह संपूर्ण कामाचे पैसे एकटाकी अदा केले जातील याची खात्री त्या भामट्याने वेगा एव्हिएशनच्या मालकांना दिली.

 belgaum

दुर्दैवाने वेगा एव्हिएशनचे मालक त्या भामट्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपल्या कॅशियरला सात वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईनद्वारे 38 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यास सांगितली. सदर रक्कम गेल्या 11 जानेवारी रोजी बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्या भामट्याने वेगा इव्हेशनच्या मालकांचा फोन उचलणे बंद केले आणि थोड्याच वेळात त्याचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. तेंव्हा वेगा इव्हिएशनच्या मालकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ बेळगावच्या सीईएन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.

Cyber police station
Cyber police station

अलीकडच्या काळात बेळगावमध्ये ओएलएक्स, ओटीपी, खोटे फेसबुक प्रोफाईल, क्यूआर कोड संबंधित ऑनलाइन फसवणुकीसह भेटवस्तू योजना, खोट्या वेबसाईट्स, घरपोच खाद्यपदार्थ, वनौषधी, बनावट कस्टमर केअर आदींच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

ही ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक खात्याची माहिती, आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही शेअर करू नये, हा एकमेव सर्वोत्तम उपाय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.