शिंदोळी येथे गेल्या रविवारी घडलेल्या दुहेरी खून प्रकरणी मारिहाळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शुभम नामक अन्य संशयित फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव परशराम केदारी (वय 25, रा. मुतगा) असे अटक आहे. शिंदोळी येथे गेल्या रविवारी गिरीश यल्लाप्पा नागूण्णवर वय 24 आणि बसवराज मारुती बेळगावकर (वय 24, दोघे रा. शिंदोळी) या तरुणांचा खून झाला होता.
ख्रिसमस निमित्त मित्राच्या घरी जीवनासाठी गेलेले हे दोघेजण रविवार रात्री अन्य एका मित्रासह जेवण आटोपून माघारी शिंदोळी येथे क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुधाच्या वाहनावरील चालकांनी त्यांच्या अंगावर वाहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.
या वादावादीचे पर्यवसान गिरीश व बसवराज या दोघांचा चाकूने भोसकून खून करण्यामध्ये झाले. याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक महांतेश बसापुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून परशराम केदारी या संशयिताला काल मंगळवारी अटक केली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.