Thursday, April 25, 2024

/

*रोटरी अन्नोत्सवा ची जय्यत तयारी.यंदा 6 जानेवारीपासून*

 belgaum

बेळगाव -बेळगावकरांच्या दृष्टीने एक अतिशय भव्य असा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावच्या वतीने आयोजित केला जातो तो म्हणजे अन्नोत्सव.

कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा होणारा अन्नोत्सव हा 6 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत अंगडी इंजिनिअरिंग कॉलेज सांवगाव रोडच्या समोरील भव्य अशा मैदानावर होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. बसवराज विभूती व सचिव रो. अक्षय कुलकर्णी यांनी दिली.

अन्नोत्सवाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अन्न ही प्रत्येकाची गरज आहे आणि वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची आवड असते. बेळगावात सर्व समाजाचे आणि देशाच्या विविध भागातून आलेले लोक राहत असल्याने त्यांची खाण्यापिण्याची आवड सुद्धा वेगवेगळी आहे.

 belgaum

या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 साली रोटरी क्लब ने सर्वप्रथम “अन्नोत्सव” उपक्रमाची सुरुवात केली. गेली 25 वर्षे सुरू असलेल्या सुरू असलेल्या या उपक्रमाने यशाची ऊंची गाठत अन्नोत्सव ला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले आहे.

संजीव कपूर ,विठ्ठल कामत, विष्णू मनोहर ,सई ताम्हणकर ,गायक अमिता गुप्ता यासारख्या प्रख्यात सेलिब्रिटीजनी भेट देऊन आजवर अन्नोत्सवाचे कौतुक केले आहे. अन्नोत्सव हा जरी रोटरी क्लबचा उपक्रम असला तरी बेळगावकरांच्या आवडीचा तो उत्सव झाला आहे. या उत्सवात देशाच्या विविध भागातून येणारे दोनशेहून अधिक स्टॉल सहभागी होणार असून त्यामध्ये काश्मीर पासून जयपुर पर्यंत, गोवा, कोल्हापूर ,सातारा,पुणे, नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थाचे स्टॉल सहभागी होणार आहेत.

यंदाचे अन्नोत्सवाचे 25 वे वर्ष असून या इव्हेंटचे चेअरमन म्हणून रो. पराग भंडारे ,रो.योगेश कुलकर्णी आणि रो.मनोज पै हे सातत्याने कार्यरत आहेत. यावर्षी अन्नोत्सवामध्ये 200 स्टॉल्स बरोबरच भव्य अशा स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे ज्या स्टेजवर रोज वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. नागरिकांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन यावर्षी पार्किंगसाठी भव्य अशी सोय करण्यात आली आहे.

तेथे सुमारे 800 कार आणि हजारो दुचाकी ठेवण्याची सोय होईल .याशिवाय स्टॉल ओनर साठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वात मोठी एल ई डी स्क्रीन बरोबरच 15 मोठे कियॉक्स बसवले जाणार आहेत. स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी प्रसाधन व्यवस्था करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे .

Annotaav bgm
अनुच्छवांमधून येणारा निधी आजवर रोटरी क्लब ने शाळा ,स्वच्छतागृह, ॲम्बुलन्स, नेत्रपेढी, त्वचा पेढी, डायलिसिस केंद्र, पोलिओ व्हॅक्सिनसाठी रेफ्रिजरेटर आणि आर्टिफिशियल लिम्बस साठी अर्थसहाय्य केले आहे .यंदाच्या या अन्नोत्सवातून मिळणारा निधी संपूर्णतः बेळगाव शहरातील विविध कामासाठीच खर्च केला जाणार आहे. अनेक लोकोपयोगी उपक्रम त्यातून राबवले जाणार आहेत. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

दररोज सुमारे 15000 नागरिक भेट देतील अशी अपेक्षा असून दहा दिवसात दीड ते दोन लाख लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. गेली दोन वर्षे खंड पडला होता त्यामुळे यंदाचा अन्नोत्सव आगळावेगळा आणि लक्षात राहण्यासारखा होईल असा विश्वास रोटरी अध्यक्षानी व्यक्त केला आहे. स्टॉल नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्नोत्सवामध्ये कोरोना बद्दलच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे तसेच या दहा दिवसात रोज गाण्यांची कार्यक्रम डान्स स्पर्धा शरीर संस्कृत स्पर्धा अशा अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची ही आयोजन करण्यात आले आहे या उत्सवात विविध क्षेत्रातील नामांकित प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार असून हा उत्सव यशस्वी करण्यासाठी रोटरी चे सर्व सदस्य जोमाने कामाला लागले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.