Friday, March 29, 2024

/

वकिलांकडून सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न

 belgaum

बेळगाव : वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी वकील संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून आज बेळगाव सुवर्णसौधला वकिलांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान सुवर्णसौधच्या प्रवेशद्वारावरून आत जाणाऱ्या वकील आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडविले. कायदामंत्र्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यासाठी येणे आवश्यक आहे, असा जोर आंदोलकांनी उचलून धरला मात्र कायदामंत्री आलेच नाहीत.Advocate protest

यावेळी आंदोलकांनी प्रवेशद्वारावर चढून आत जाण्याचा प्रवेश केला. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली.

 belgaum

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वकील संघटनेच्या आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देत कायदामंत्र्यांचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.