Monday, January 6, 2025

/

बेळगावात दोन यशस्वी कोक्लेयर इम्प्लांट शस्त्रक्रिया

 belgaum

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या इएनटी व एचएनएस विभागाने दोन बालकांवर कोक्लेयर इम्प्लांट ही यशस्वी शस्त्रक्रिया केली असून ती दोन बालके बेळगाव व रायबाग येथील आहेत. सदर शस्त्रक्रियेद्वारे या हॉस्पिटलने अत्याधुनिक वैद्यकीय उपचारातील प्रगतीच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

मुलांमधील जन्मजात ठार बहिरेपणा अथवा श्रवण दोषावर कोक्लेयर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही वरदान असल्याचे जगभरात सिद्ध झाले आहे. श्रवणदोष दूर करण्यासाठी उपचार करून अथवा श्रवण यंत्रे वापरूनही फायदा होत नसलेल्या मुलांसाठी ही शस्त्रक्रिया एकमेव आशा स्थान आहे.

कर्नाटक सरकारच्या सुरक्षा आरोग्य सुवर्ण ट्रस्ट योजनेअंतर्गत कोक्लेयर शस्त्रक्रिया करणारे उत्तर कर्नाटकातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड एमआरसी हे एकमेव अधिकृत खाजगी हॉस्पिटल आहे. सदर हॉस्पिटलला हा मान मिळण्याचे सर्व श्रेय केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अथक प्रयत्नांना जाते.Cochlear Implant Surgeries

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दोन बालकांवरील कोक्लेयर इम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जेएनएमसी कॉलेज बेळगावच्या माजी विद्यार्थी व बेंगलोरच्या सर्जन डॉ. वासंती आनंद यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बी. पी. बेलदवर, डॉ. ए. एस. हारूगोप, डॉ. प्रीती एस. हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह भूलतज्ञ डाॅ. केदारेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोक्लेयर इम्प्लांट कार्यक्रमाच्या सह-समन्वयक डॉ. प्रीती हजारे यांनी दोन्ही बालकांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे स्पष्ट करून लवकरच त्या बालकांना डिस्चार्ज देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.