Wednesday, June 25, 2025

/

नदीच्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

 belgaum

आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा नदीच्या कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावानजीक घडली.

विनायक हनुमंत बिराजवर (वय 22, रा. उगरगोळ) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. उगरगोळ गावानजीक असलेल्या मलप्रभा नदीच्या कालव्याच्या ठिकाणी आंघोळीसाठी गेला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे विनायक पाण्यात बुडाला.

याबाबतची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन विनायकचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. यावेळी कालव्याच्या काठावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सदर घटनेची सौंदत्ती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.