belgaum

गोव्याच्या महिलेचा मृत्यू; खानापूर अपघातात पती गंभीर

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह :खानापूर अनमोड रस्त्यावर झालेल्या अपघातात गोव्याच्या महिलेचा मृत्यू तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

खानापूर–अनमोड मार्गावरील पाली गावाजवळ मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. गोवा नोंदणी असलेली एक कार अरुंद रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने हा अपघात झाला आहे .

मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात जागृती हरिदास (रा. गोवा) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती दत्तप्रसाद हे गंभीर जखमी झाले आहेत.

 belgaum

जखमी दत्तप्रसाद यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खानापूर येथे झालेल्या एका विवाह समारंभाला उपस्थित राहून हे दाम्पत्य ओल्ड गोवाकडे परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.