Friday, May 10, 2024

/

बेळगावमधील मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा लाखोंची चोरी!

 belgaum

बेळगाव शहर, परिसर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून मंगळवारी दुपारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेरी गल्ली कॉर्नर जवळ भरदिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी १.३० ते २.०० च्या सुमारास अज्ञातांनी बंद घराला लक्ष्य करत कुलूप तोडून चोरी केली आहे.

अभिजित अप्पासाहेब बोगार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

 belgaum

भरदिवसा झालेल्या या चोरी प्रकरणामुळे आसपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.