Friday, April 26, 2024

/

राज्य क्रिकेट संघात ‘या’ क्रिकेटपटूंची अभिनंदनीय निवड

 belgaum

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) विदर्भ येथे पुढील महिन्यात आयोजित पुरुषांच्या 16 वर्षाखालील प्रतिष्ठेच्या विजय मर्चंट ट्रॉफी -2022 क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा संघ जाहीर करण्यात आला असून या संघात बेळगावच्या सिद्धेश अनिल असलकर आणि मनीकांत शिवानंद बकीटगार यांची अभिनंदनी निवड झाली आहे.

बीसीसीआयतर्फे विदर्भ येथे येत्या 1 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये पुरुषांची 16 वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफी -2022 क्रिकेट स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने आपला 16 जणांचा संघ जाहीर केला आहे.

या कर्नाटक राज्याच्या संघात धारवाड विभागातून बेळगावचे होतकरू युवा क्रिकेटपटू सिद्धेश अनिल असलकर (सोशल क्रिकेटर्स) आणि मनीकांत शिवानंद बकीटगार (व्हल्चर्स क्रिकेट क्लब) यांनी स्थान मिळवले आहे. या दोघांना त्यांच्या पालकांसह कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धारवाड विभागाचे माजी निमंत्रक अविनाश पोतदार आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक पवार यांचे प्रोत्साहन, तसेच क्रिकेट प्रशिक्षक संगम पाटील, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील व प्रमोद असलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा 16 वर्षाखालील पुरुष संघ पुढीलप्रमाणे आहे.Cric

 belgaum

आदेश डी. अर्स (कर्णधार -राजाजीनगर क्रिकेटर्स), अनंथ एस. (बेंगलोर स्पोर्ट्स क्लब) अर्णव मिश्रा (व्हल्चर्स क्रिकेट क्लब), सिद्धेश ए. असलकर (धारवाड झोन /सोशल क्रिकेटर्स), दैविक एस. (द बेंगलोर क्रिकेटर्स), अंकित शेट्टी (रायचूर झोन /विजया क्रिकेट क्लब), अर्णव शर्मा (यष्टीरक्षक -बेंगलोर स्पोर्ट्स क्लब), ऋषभ बी. नायक (यष्टीरक्षक -मंगलोर झोन /विश्वेश्वरपूर क्रिकेट क्लब), अक्षत प्रभाकर (विजया क्रिकेट क्लब), मनीकांत एस. बकीटगार (धारवाड झोन /व्हल्चर क्रिकेट क्लब), इसा पुथगी (केंब्रिज क्रिकेट क्लब), सम्यक वेल्लोरे (व्हल्चर क्रिकेट क्लब) तेजस के. ए. (राजाजीनगर क्रिकेटर्स), मोहम्मद इब्राहिम रयान (शिमोगा झोन /केंब्रिज क्रिकेट क्लब), हिमेश आर.

(म्हैसूर झोन /स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब), प्रशिक्षक : कुणाल कपूर, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच : स्नेहीत राय, फिजिओथेरपीस्ट : गौथम एम. एस., व्यवस्थापक : सुमंथ पी. व्ही उपरोक्त सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने उद्या शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता बेंगलोरच्या केएससीए ‘ए’ ग्राऊंडवर प्रशिक्षक कुणाल कपूर यांच्यासमोर हजेरी लावायची आहे. दरम्यान कर्नाटक संघात निवड झाल्याबद्दल सिद्धेश असलकर आणि मनीकांत बकीटगार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.