Thursday, May 2, 2024

/

बेळगावचा नावलौकिक वाढविणारे ‘ट्रिपल एसआर’ रोहन हरगुडे

 belgaum

जाधवनगरचे रहिवासी आणि वेणूग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य असलेल्या रोहन हरगुडे यांनी सायकलिंगमधील प्रतिष्ठेचा ट्रिपल एसआर (ट्रिपल सुपर रेनडोनर) किताब हस्तगत केला आहे. याद्वारे हा किताब पटकावणारा उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू होण्याचा सन्मान मिळवत त्यांनी बेळगावच्या नावलौकिकात भर घातली आहे.

बेळगावचे सायकलपटू रोहन हरगुडे यांनी उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा रोवला आहे. एकाच वर्षात तीन एसआर किताब मिळवत ट्रिपल एसआर किताब पटकावणारे ते पहिले सायकलपटू आहेत. बेळगावकरांसाठी ही अभिमानाची बाब असून रोहन हरगुडे हे वेणुग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य आहेत.

रेनडोनर हा दीर्घ अंतराचा सायकलिंग क्रीडा प्रकार आहे. जो 200 कि. मी. किंवा त्यापेक्षा अधिक कि. मी. अंतराचा असतो. ट्रिपल एसआर अर्थात ट्रिपल सुपर रेनडोनर म्हणजे वर्षातून तीन वेळा 200 कि. मी., 400 कि. मी. आणि 600 कि. मी. असा सायकल प्रवास पूर्ण करणे. हा खडतर प्रवास रोहन हरगुडे यांनी नोव्हेंबर 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करून प्रतिष्ठेचा ट्रिपल एसआर किताब हस्तगत केला आहे.Rohan hargude

 belgaum

हा पराक्रम करणारे ते बेळगाव बरोबरच उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव सायकलपटू असून पुणे आणि बेंगलोर या ठिकाणी सदर ट्रिपल एसआर किताब प्राप्त सायकलपटू आहेत. त्यामुळे रोहन हरगुडे यांचे हे यश बेळगावकरांसाठी निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. वेणूग्राम सायकलिस्ट क्लबकडून मिळणारे प्रोत्साहन आणि सायकलिंगची जिद्द यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, असे हरगुडे म्हणतात.

कोल्हापूर -सांगली, कोल्हापूर -सातारा, निपाणी -कोल्हापूर असा ट्रिपल एसआरचा प्रवास रोहन हरगुडे यांनी पूर्ण केला आहे. सदर सायकल राईड सांगली आयोजित केली होती सायकलिंग बरोबरच रोहन हरगुडे यांना फुटबॉल खेळाची ही आवड आहे. एकेकाळी मातब्बर फुटबॉलपटू असलेल्या रोहन यांनी 1999 च्या कालावधीत बेळगावचे फुटबॉल क्षेत्र गाजविले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.