Tuesday, June 25, 2024

/

बेला बाझार’ मेगा शॉपिंग -फूड फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद

 belgaum

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेला ग्रुपतर्फे गेल्या तीन दिवसांपासून आयोजित ‘बेला बाझार’ या भव्य मेगा दिवाळी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हल या विक्री -प्रदर्शनाला सध्या उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

महिलांमधील उद्यमशीलता वाढावी या हेतूने रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे आयोजित बेला बाजार फेस्टिव्हलमध्ये स्थानिक महिलांनी आपण तयार केलेल्या उत्पादनांचे तसेच अन्य वस्तूंचे स्टॉल मांडले आहेत. सदर विक्री -प्रदर्शनात एकूण 80 स्टॉल असून त्यामध्ये विविध प्रकारची तोरणे, दिवाळी लाइटिंग, पर्स, साड्या, खणांचे पोशाख, शोभेच्या वस्तू, विविध प्रकारची कृत्रिम फुले, दिवाळीचा फराळ, सौंदर्यप्रसाधने, कृत्रिम दागिने, प्लेटेड वस्तू, गृह सजावटीचे साहित्य आदी स्टॉल्सचा समावेश आहे.

याखेरीज खवय्यांसाठी मिसळ, ज्वारीचे वडे, गिरमिट, डोसा, सँडविच विविध प्रकारचे वेफर्स, मुखशुद्धीचे पदार्थ वगैरे विभिन्न खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील आहेत. थोडक्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेला बाझारच्या माध्यमातून जवळपास सर्व प्रकारची खरेदी एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.Bela bazar

 belgaum

सदर भव्य खुल्या मेगा दिवाळी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हलला भेट देणाऱ्यांसाठी सरप्राईज ऑफर, वाद्यवृंद, मुलांचा विभाग, बऱ्याच स्टॉलच्या ठिकाणी लकी ड्रॉ ऑफर उपलब्ध आहे.

ड्रीम्ज इव्हेंट्स ही संस्था माधवबाग, बायज्यूस ट्युशन सेंटर, बायज्यूस लर्निंग ॲप, नारीशक्ती, ड्रीम्ज आदींच्या सहकार्याने या बेला बाझारचे संयोजन करत आहेत. गेल्या शनिवारपासून दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत उस्फुर्त प्रतिसादात सुरू असलेल्या बेला बाझारचा उद्या मंगळवार दि 18 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.