Friday, April 26, 2024

/

मराठा बँकेतर्फे डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्कार

 belgaum

सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बेळगावमध्ये “शिवप्रताप गरुडझेप” या नव्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याच औचित्याने मराठा को – ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मराठा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्याहस्ते डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि समिती नेते प्रकाश मरगाळे यांनीही डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेतली.

 belgaum

सत्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, बेळगावकरांनी ज्यापद्धतीने शिवरायांची संस्कृती, इतिहास आणि मराठी नाळ जपली आहे याचा मला आदार आहे. बेळगावविषयी आपल्याला कमालीचे प्रेम आणि आस्था आहे. शिवरायांचा इतिहास जपण्यात बेळगावकर अग्रेसर आहेत.Amol kolhe

नकाशात जरी सीमा रेखाटल्या असल्या तरी आपण सारेच छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळे असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी “शिवप्रताप गरुडझेप” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून पुढील पिढींवर चित्रपटाच्या माध्यमातून संस्कार व्हावेत यासाठी चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, सुनील अष्टेकर, सुशीलकुमार खोकाटे, विनोद हांगीरकर, शेखर हंडे, मोहन चौगुले, सौ. रेणू किल्लेकर, बी. बी. खंडागळे, नयन मिरजकर, जयराज मोदगेकर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. शेवटी व्हा. चेअरपर्सन सौ. नीना काकतकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.