belgaum

बेळगावची होतकरू उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू श्रेया भोमाणा पोटे हिची 19 वर्षाखालील महिलांच्या संभाव्य कर्नाटक राज्य क्रिकेट संघामध्ये अभिनंदन निवड झाली आहे. या पद्धतीने निवड होणारी ती बेळगावची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे.

bg

हिंडलगा -सुळगा येथील व्यावसायिक भोमाणा पोटे यांची कन्या श्रेया ही अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. गावातील सरकारी मराठी शाळेत इयत्ता 5 वी पर्यंत शिक्षण घेतलेली श्रेया सध्या महिला विद्यालय हायस्कूलमध्ये इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे बेंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या महिन्याच्या आरंभी 19 वर्षाखालील महिलांच्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार विभागांमध्ये खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत श्रेया पोटे हिने ‘क’ विभागाचे प्रतिनिधित्व करताना सरस कामगिरी बजावली होती.Shreya p

आंतर विभागीय स्पर्धेतील उत्तम कामगिरीची दखल घेत कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या निवडीसाठीच्या संभाव्य 30 खेळाडूंमध्ये श्रेया पोटे हिचा समावेश करण्यात आला आहे. या पद्धतीने निवड होणारी श्रेया ही 19 वर्षाखालील बेळगावची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे.

श्रेयाचे फिटनेस कोच ओमकार मोटार हे असून तिला क्रिकेट प्रशिक्षक फिरोज शेख यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

yash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.