Wednesday, January 15, 2025

/

माझ्या दृष्टिक्षेपातील पितृपक्ष!

 belgaum

जीवन म्हणजे कांही वेगळे नाही, जीवन ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिला वाचवण्यासाठी तुम्ही आटापिटा करता, परंतु ती सतत हातातून निसटत असते. हे जीवन आपला उद्देश पूर्ण करून अनंतकाळासाठी हरवत असले तरी तुम्ही ते कसे जगलात? आणि कशासाठी तुम्ही कायम सर्वांच्या लक्षात राहाल? हे महत्त्वाचे असते.

आपल्या पूर्वजांच्या स्मृती जागवणारा हा पक्ष पंधरावडा आहे. या पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी देवांचे पृथ्वीवर आगमन होते आणि ते आपल्या सोबत नऊ दिवस राहतात असे मानले जाते. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींचे गांभीर्याने पालन म्हणजेच हा महालय पंधरावडा होय. मृतांना आणि आपल्या पूर्वजांना आदरांजली -श्रद्धांजली वाहणे हे कांही आपल्याला नवे नाही. इजिप्शियन आणि रोमन देखील हेच करतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व संस्कृतींमध्ये एकच विचार रुजला आहे, तो म्हणजे या नश्वर जगातील आयुष्यात आपल्याला जे सुख मिळाले तेच सुख नंतरच्या जीवनातही मिळायला हवे. यासाठीच म्हणून की काय प्राचीनकाळी गर्भ श्रीमंत व्यक्ती किंवा एखाद्या राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहासोबत सोनानाणं, हिरेजवाहरात, कपडेलत्ते अशा राजाच्या आवडीच्या गोष्टी दफन केल्या जात. दुर्दैवाने त्यांचा ना त्या श्रीमंत माणसाला उपयोग व्हायचा ना राजाला परंतु कालांतराने त्या संपत्तीमुळे टॉम रायडर्स अर्थात थडगे हल्लेखोरांची मात्र चांदी व्हायची. नंतरच्या जीवनात आत्म्याला ऐषआरामाची आवश्यकता असते ही कल्पनाच मुळी मला परकी वाटते. नश्वर जीवनाच्या वरदानांचा आनंद आत्मा लुटू शकतो हेच मुळे हास्यास्पद आहे. तथापि हा विषय धर्माच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे मी त्यावर जास्त अधिकाराने बोलू शकत नाही. परंपरा या विश्वास आणि तर्कशुद्ध विचारातून निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक संस्कृती वंशपरंपरेनुसार असते. त्यामुळे साहजिकच त्या परंपरेवर त्या संस्कृतीची छाप असते.

इस्लाममध्ये शब् -ए -बरात या रात्री म्हणजे देव जेंव्हा सजीवांसाठी नव्या योजना आखत असतो त्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून अत्यंत श्रद्धेने आपल्या पूर्वजांना क्षमा करण्याची प्रार्थना केली जाते. आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे मला प्रशंसनीय वाटते. कारण ते होते म्हणून आपण आहोत. रोमन आपल्या मृत व्यक्तींचे श्रद्धेय फेब्रुवारीत करतात आणि त्याला पेरिनटालिया म्हंटल जात. तथापि आपण भारतीय ते विधी पंधरावाड्यात करतो, ज्याला पितृपक्ष म्हटले जाते. हा पितृपक्ष गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या दरम्यान असतो. यावेळी केल्या जाणाऱ्या विधींना श्राद्ध म्हंटले जाते. याचा संदर्भ पौराणिक कथामधील दोन्ही बाजूची प्रचंड हानी झालेल्या देव आणि दानव यांच्यातील युद्धाशी जोडला गेलेला आहे. चंद्र चक्रामध्ये वडील अथवा पूर्वजाच्या निधनाच्या दिवसाला तिथी अथवा दिवस म्हंटले जाते. हा दिवस वेगवेगळ्या दिवशी आचरला जातो. उदाहरणार्थ तुमचे पूर्वज गेल्या वर्षभराच्या कालावधीत वारले असतील तर तुम्ही पंधरवड्याच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध घालू शकता, जर एखादी महिला वारली आणि तिचा पती जिवंत असेल तर नवव्या दिवशी, जर एखादे मूल किंवा साधुसंत वारले असतील तर बाराव्या दिवशी आणि जर एखाद्याचा मृत्यू हिंसकरित्या किंवा लढाईत झाला असेल तर चौदाव्या दिवशी श्राद्ध घातले जाते. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू केंव्हा झाला आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही वेळेत श्राद्ध घालण्यास विसरला असाल तर तो विधि तुम्ही अमावस्येला अथवा चंद्राचा दिवस नसताना करू शकता. या पद्धतीने वेगवेगळे दिवस कसे निवडण्यात आले हे निश्चितपणे माहीत नसले तरी सर्व पूर्वजांना एकाच दिवशी दोन जगामध्ये प्रवास करणे अवघड जात असावे आणि भटजींना एकाच दिवशी सर्व भेटींचे (अपॉइंटमेंट) व्यवस्थापन करणे सुलभ जावे यासाठी विविध दिवस निवडण्यात आले असावेत. याखेरीज श्रद्धा दिवशी ब्राह्मणाला भोजन घालणे अनिवार्य असते आणि ब्राह्मणांची लोकसंख्या समाजात अवघी 2 टक्के असल्यामुळे एकाच दिवशी सर्वांचे आमंत्रण स्वीकारणे त्यांच्यासाठी अवघड असते, हे देखील कारण असावे.Crow

श्रद्धा दिवशी कावळ्यांना अन्न दिले जाते आणि हा अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. श्राद्धा दिवशी कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनेक धर्मामध्ये कावळा किंवा डोंबकावळा यांना आदरणीय मानले जाते, शिवाय त्याच्याशी मोठा गुढवादही जोडला गेला आहे. आपल्या मृत पूर्वजांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन ते आनंदी असतील तर श्रद्धा दिवशी कावळा अन्नाला शिवतोय असे मानले जाते. कावळाच हा निवडक पक्षी का? यामागे काहीतरी चांगले आध्यात्मिक कारण असले पाहिजे. याचे निश्चित स्पष्टीकरण देता येणार नसली तरी बहुधा ठराविक प्रमाणातील कावळ्यांची संख्या याला कारणीभूत असावी. कावळा हा जलद शिकणारा पक्षी आहे. जो सूक्ष्म निरीक्षण करण्यात पटाईत असण्याबरोबरच तुम्ही त्याला जास्तच अस्वस्थ केले तर तो तुम्हाला टोच मारू शकतो. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो मानवांमध्ये आरामात राहू शकतो. कावळ्याला अन्नाचा माग लगेच लागतो आणि तो कधीच एकट्याने अन्न खात नाही. अन्नाचा माग लागला की कावळे थव्याने जमा होतात. तुम्ही पहा कावळा हा एकमेव पक्षी आहे जो कोणत्याही जीवनशैलीशी जुळवून घेऊ शकतो. कावळा हा भुकेने खाणारा आणि स्थलांतरित न होणारा पक्षी असल्यामुळे सहजपणे मोठ्या संख्येने उपलब्ध होणारा नैसर्गिक प्रतिनिधी ठरतो. श्रद्धा दिवशी कावळा हा एखाद्या अतिमहणी व्यक्तीप्रमाणे असतो. त्याने अन्नाला शिवल्याशिवाय कोणीही अन्नाला शिवत नाही आणि म्हणून त्या एका दिवशी जगभर कावळे असावेत ही तुमची इच्छा असते. कावळ्याने अन्न शिवल्यानंतरच मग सहकुटुंब भोजनाचा कार्यक्रम पार पडतो.

धार्मिक विधी महत्त्वाचे असले तरी सर्व धार्मिकता बाजूला सारून आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याची खडतर मेहनत, कठीण प्रसंगी जीवन जगण्याचे त्यांचे ज्ञान आणि काही वेळेला त्यांनी कमविलेली संपत्ती वाईट काळात आपल्याला आधार देते. आपले अस्तित्व उध्वस्त करणाऱ्या चुका टाळून योग्य मार्ग चोखाळण्यासाठी आपल्या पूर्वजांपासून आणि इतिहासापासून धडा घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वजांचा वारसा आहे म्हणून आपण आज जगतोय आणि त्यांचं नाव पुढे नेतोय. देव, शिक्षक आणि पालक हे आपल्या अस्तित्व आणि पालनपोषणास जबाबदार आहेत. आपण देवाचे दररोज स्मरण करतो, परंतु ते तेंव्हाच योग्य ठरेल जेंव्हा वर्षातून एकदा तरी आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करू.

-डॉ. माधव प्रभू.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.