Friday, December 27, 2024

/

शहर तालुका उपनगरात रेकॉर्ड ब्रेक महाप्रसाद संपन्न

 belgaum

गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट टळून सर्व अटी-नियम, निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अपूर्व उत्साहात साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवाचा पाचवा योगायोगाने आजचा रविवार असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आज रेकॉर्ड ब्रेक महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना संपल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नियम, अटी यांचे बंधन नसल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील सालाबाद प्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

मात्र गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवार आल्यामुळे गणेशोत्सव मंडळांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळत होते. आज रविवारी सकाळपासून गणहोम, अथर्वशीर्ष पठण, सत्यनारायण पूजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाप्रसाद वितरण करण्यात आले.

शहर उपनगरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सवामंडळासमोर आज दुपारी महाप्रसाद वितरणाचे चित्र पाहायला मिळाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी आपल्या सोयीनुसार महाप्रसादाचे आयोजन करतात. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे महाप्रसाद आयोजित करण्यात आला नव्हता.

कोरोना संदर्भातील गर्दीचा नियम आता रद्द झाला असल्यामुळे यावर्षी हरएक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाप्रसाद आयोजित केला असून आज रविवारी तर रेकॉर्ड ब्रेक महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडले. शहरासह शहापूर, अनगोळ, टिळकवाडी सदाशिवनगर आदी उपनगरातील प्रत्येक गल्ली गल्लीतील मंडळांनी महाप्रसाद आयोजित केला असल्यामुळे संबंधित भागात दुपारनंतर गणेश भक्तांची गर्दी दिसून आली.Ganesh mahaprasad

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव प्रामुख्याने ब्रिटिशांच्या विरोधात सर्व समाज एकत्रित यावा या उद्देशाने सुरू केला होता. त्यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अबाधित ठेवत बेळगाव शहर उपनगरातील प्रत्येक मंडळ आपल्या गल्ली अंतर्गत विविध उपक्रम तसेच कार्यक्रम आयोजित करून ऐकोपा जपत आहे. या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणजे महाप्रसाद वाटप होय. हा उपक्रम प्रामुख्याने आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडला.

शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आज सकाळी गणहोम झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद वितरित केला. महाआरतीत सहभागी होऊन शेकडो गणेश भक्तांनी ठिकठिकाणच्या महाप्रसादाचा लाभ घेतला

उचगावात महाप्रसाद

उचगाव गणपत गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि श्री. शिवज्योत युवक मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य एल. डी चौगुले हे होते.
महाप्रसादाचे उद्घाटन म.ए. समितीचे युवा नेते आर. एम चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला गाम पंचायत उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य बाळकृष्ण तेरेसे, माणिक होनगेकर. शशी जाधव. गणेश दुध संघाचे प्रविण देसाई. सुधाकर करटे. सागर कटगेण्णवर. अशोक चौगुले. लुम्माण्णा पावशे. शंकर पाटील. रोहीदास हंडे. रामदास चौगुले. शशीकांत चौगुले. रामदास चौगुले. आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.