Sunday, December 22, 2024

/

गणेश उत्सवात बेळगाव live चा सामाजिक उपक्रम

 belgaum

बेळगाव live च्या वतीनं गणेशोत्सव निमित्त सामाजिक संदेश देणारे घरगुती देखावे, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आणि विधायक गणेश मंडळाचा सत्कार असा संयुक्तिक कार्यक्रम नरगुंदकर भावे चौक गणेश मंडपात झाला.मराठा बँकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मराठा मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव,मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर, मराठा बँकेचे संचालक सुनील अष्टेकर जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील उपस्थित होते.बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी प्रास्तविक केले तर एम्स कोचिंग अकादमीचे रवी बेळगुंदकर यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रीन सेव्हिंयर्स
सर्वप्रथम Green Saviers या संस्थेने बेळगाव आणि आसपासच्या भागांमध्ये जवळपास दोन लाख झाडे लावून पर्यावरणाला संवर्धन करत बेळगाव शहराला ग्रीन बेळगाव बनवण्यासाठी जे महत्त्वाचे योगदान दिले आहे

श्रीराम सेना हिंदुस्थान
गोरगरीब आणि निराश्रीतांना मदत करून बेळगाव शहरात अद्वितीय सामाजिक कामगिरी करणाऱ्या श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेचा सत्कार करण्यात आला. Covid काळात संघटनेतर्फे करण्यात आलेल्या कार्यांचा येथे विशेष उल्लेख करण्यात आला. त्याचबरोबर या संघटनेने वडगाव येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५०० Ltr रक्त जमा करून एक नवीन कीर्तिमान रचला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी मध्यवर्ती गणेश उत्सवाची जबाबदारी देखील आपल्या हाती घेतली आहे.Bgm live function ganesh

संस्कृती एज्युकेअर
संस्कृती Educare चे संस्थापक तेजस कोळेकर यांचा देखील सत्कार करण्यात आला . संस्कृती Educare हि संस्था मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासाठी कार्यरत आहे. मुलांना आपल्या सांस्कृतिक मौल्याना जपत व्यक्तिमत्व विकास कसा करावा , आजच्या आधुनिक काळात पालकांनी योग्य पद्धतीने आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे या विषयावर समाजाला प्रबोधन करत असतात. त्याच बरोबर आजच्या धावपळीच्या जीवन पद्धतीमध्ये विशेष करून स्त्रियांनी आपल्या मानसिक स्वास्थाची काळजी कशी घ्यावी यावर देखील संस्थेतर्फे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.

सर्वलोक फौंडेशन
सर्व लोक फाऊंडेशनचे वीरेश हिरेमठ यांचा देखील येथे सत्कार करण्यात आला. या संस्थेतर्फे मंदिर परिसरात, झाडा खाली ठेवलेल्या देवांच्या मूर्त्यांचे व प्रतिमांचे धार्मिक पद्धतीने विसर्जन करण्यात येते. अपघातामध्ये मृत बेवारस प्राण्यांचे धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार देखील या संस्थेतर्फे करण्यात येतो.

पशु माझा धर्म बचाव दल
हा माझा धर्म पशु बचाव दल, विनायक केसरकर यांचा देखील येथे सत्कार करण्यात आला काकती परिसरामध्ये हायवेवर व रोडवर जखमी, वेदनाग्रस्थ जनावरांचे उपचार करून त्याची काळजी घेण्याचे कार्य हि संस्था करते. या संस्थेतर्फे आजपर्यंत कितीतरी मूक जनावरांचे उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात आला आहे.

आनंदाश्रम

आनंदाश्रम नावाचे वृद्धाश्रम चालवणाऱ्या रूपा चोळापाचे यांचा देखील येथे सत्कार करण्यात आला निराश्रित वृद्ध व्यक्तींना मदत करणे त्यांना आसरा देणे त्यांना सुखी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य हि संस्था करते.

सामाजिक कार्यकर्ते सर्प मित्र
सर्पमित्र गणेश दड्डीकर यांचा देखील येथे सत्कार करण्यात आला. गणेश दड्डीकर सर्पमित्र आणि एक प्राणी मित्र म्हणून बेळगाव शहरात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत कितीतरी सर्पांचे ,गाईंचे ,पक्षांचे आणि माकडांचे प्राण वाचविले आहेत. गणेश शिक्षणाचे देखील पुरस्कर्ते आहेत त्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे त्याचबरोबर मराठा समाजातील मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ते आर्थिक मदत करतात. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले केलेले समाजकार्य सराहनीय आहे.

बेळगावचे ब्लड मॅन
बेळगावची ब्लड मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे संजय पाटील यांचादेखील येथे सत्कार करण्यात आला संजय पाटील यांनी जवळपास 100 हून अधिक गरजवंत लोकांना रक्तदान करून त्यांचा जीव वाचवण्याचे महान कार्य केले आहे. समाज कार्य करण्यासाठी फक्त पैशाची गरज नसते तर समाजासाठी संवेदना असेल तर कोणतीही व्यक्ती समाजकार्य करु शकते याचे उदाहरण संजय पाटील यांनी घालून दिले आहे.

बेळगाव live तर्फे आयोजित सामाजिक संदेश देणाऱ्या घरगुती गणेश देखाव्याच्या स्पर्धे मध्ये विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले

प्रथम क्रमांक राशी बेळगुंदकर
लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी बाळ गणपती अंगणवाडीचा राजा हा देखावा

द्वितीय क्रमांक सागर मुतगेकर
आपली सांस्कृतिक धरोहर गड आणि किल्यांचे संवर्धन करण्याचा संदेश देणारा देखावा

तृतीय क्रमांक ज्योतिबा हनुमंताचे
तरुणांना शेतीशी आणि मातीशी जुडण्याचा संदेश देणारा देखावा

चतुर्थ क्रमांक प्रकाश अनगोळकर
प्लास्टिक आणि चिनी वस्तू न वापरता, माती गवत व कागद वापरून इको फ्रेंडली सजावट देखावा

पाचवा क्रमांक स्वयंम दरवंदर
समजला परत शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित करणारा देखावा
प्रोत्सानहपर बक्षीस भूषण चौगुले

विधायक गणेश मंडळ(प्रोत्साहन पर)

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक शिवाजी हंडे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तानाजी गल्ली राहुल मुचंडी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एसपीएम रोड अशोक हलगेकर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संभाजी रोड खासबाग संदीप जाधव

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.