Saturday, April 20, 2024

/

*कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी*

 belgaum

कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याने दोघं जण जखमी झाल्याची घटना कॅम्प पोलीस स्थानक व्याप्तीत घडली आहे.College students clash

कॉलेज रोडवरील बस स्थानक परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यावेळी या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वातावरण शांत करत तणाव कमी केला.

श्रीहरी नावाच्या जखमी झालेल्या विद्यार्थ्याने जिल्हा रुग्णालयातून उपचार घेतला आहे. याप्रकरणी कॅम्प पोलिस अधिक तपास करत आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मारामारी केलेले कॅम्प भागातल्या एका कॉलेजचे हे विद्यार्थी असून दोघांच्यात प्रेम प्रकरणा वरूनच वाद निर्माण झाला असावा त्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणी नेमकं काय आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.